AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुड न्यूज… सरकारी कर्मचाऱ्यांना 7 हजाराऐवजी मिळणार 21 हजार बोनस?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या ७ हजार रुपयांऐवजी २१ हजार रुपये बोनस देण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. किमान वेतन २१ हजार रुपये असल्याने बोनसची मर्यादाही वाढवावी अशी त्यांची मागणी आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली तर कर्मचाऱ्यांचा बोनस तिप्पट होईल, ज्यामुळे दिवाळी सणाच्या उत्साहात भर पडेल.

गुड न्यूज... सरकारी कर्मचाऱ्यांना 7 हजाराऐवजी मिळणार 21 हजार बोनस?
bonusImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 3:03 PM
Share

दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खूशखबर मिळू शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 हजाराऐवजी 21 हजार रुपये बोनस देण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. जर केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बोनस थेट 14 हजाराने वाढू शकतो. म्हणजे सध्या जो बोनस मिळत आहे, त्याच्या तिप्पट बोनस या कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. दरम्यान, सरकारने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.

केंद्रीय कर्मचारी संघटनेची मागणी मान्य झाल्यास कर्मचाऱ्यांचा बोनस तिप्पट वाढू शकतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा 6908 रुपये बोनस थेट 20724 रुपये होणार आहे. सध्या तरी कर्मचाऱ्यांची ही मागणीच आहे. त्यावर सरकारचे अंतिम आदेश आलेले नाहीत. शिवाय दिवाळीला अजून उशीर असल्याने सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

पत्रात काय म्हटलं?

नॅशनल कौन्सिल स्टाफ साइड ज्वॉइंट कन्सल्टेटिव्ह मशीनरीच्या कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आली आहे. त्यात बोनसच्या कॅलक्यूलेशनची लिमिट वाढवण्याची मागणी केली आहे. 27 ऑगस्ट रोजी कॅबिनेट सचिव शिव गोपाल मिश्रा यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे. जर केंद्र सरकारकडून न्यूनतम मजदुरीचा स्तर 21 हजार रुपये ठेवण्यात आला आहे, तर बोनसचा कॅलक्यूलेशन सुद्धा कमीत कमी त्या अमाऊंटवर असलं पाहिजे. येत्या 20 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. त्यापूर्वीच सरकारने बोनस बाबतचे आदेश जारी केले पाहिजेत, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आता किती बोनस मिळतो?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीच्या आसपास एक महिन्याच्या बरोबरीत नॉन प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस मिळतो. त्याचं कॅलक्यूलेशन सध्या 7 हजार रुपये अधिक वेतन लिमिटच्या आधारे केलं जातं. बोनस काढण्यासाठी 30.4 सरासरी दिवसांचा फॉर्म्युला ठेवण्यात आला आहे.

आठव्या वेतन आयोगात बोनसचा मुद्दा

कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगाच्या समोरही बोनसचा मुद्दा उठवला आहे. ऑल इंडिया न्यू पेन्शनल स्कीम एम्प्लॉइज फेडरेशनने वेगळ्या कॅलक्यूलेशनच्या आधारे सुमारे 26 हजार 941 रुपये बोनसचा सल्ला दिला आहे. पण सर्वाधिक मोठी मागणीही 21 हजार रुपये बोनस कॅल्यक्यूलेशनची लिमिट करण्याची आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक