मोदी सरकारची ताकद वाढली; डिलिमिटेशनला आणखी एका पक्षाचा पाठिंबा, 22 खासदार…

मोदी सरकारची ताकद आणखी वाढणार आहे. डिलिमिटेशनवरून आणखी एका पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे.

मोदी सरकारची ताकद वाढली; डिलिमिटेशनला आणखी एका पक्षाचा पाठिंबा, 22 खासदार...
Breaking News
| Updated on: Nov 28, 2026 | 12:03 PM

देशात डिलिमिटेशनवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 22 खासदार असलेल्या डीएमके पक्षाने डिलिमिटेशन विधयेकाला पाठिंबा दर्शवला आहे. एमके स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाची शनिवारी एक बैठक केली. या बैठकीत डिलिमिटिशेनला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचे ठरलं आहे. डीएमके यांच्या पक्षाच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेतील दोन-तृतियांश खासदारांच्या मतांची गरज आहे. या अधिवेशनाआधीच भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या विधेयकावरील भूमिकेला आणखी एका पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. 22 खासदार असलेल्या डीएमके पक्षाने या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. डीएमके पक्षाचे सर्व खासदार विधेयक मंजूर करण्यास महत्वाची भूमिका निभावू शकतात.

Loading...

मीडिया रिपोर्टनुसार,  डीएमकेच्या नेत्यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवण्याची इच्छा दर्शवली आहे. केंद्र सरकारने पार्टी डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्या दोन मागण्या देखील मान्य केल्या आहेत. लोकसभेतील तामिळनाडूतील 7.18 टक्के वाटा कायम ठेवणे आणि पुढील 25 वर्षांसाठी सध्याचं प्रतिनिधित्व गुणोत्तर कायम ठेवणे, या दोन अटी मान्य केल्याची चर्चा आहे.

डीएमके पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या दोन मागण्या मान्य केल्या आहेत. यावरून आमचा पक्षाने या विधेयकाला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. आमच्या पक्षाच्या खासदारांच्या पाठिंब्याने एनडीएचं पारडं जड होईल.   त्यांनी संसदेत विधेयक मंजूर करण्यासाठी दोन-तृतियांश मतांची आवश्यकता आहे. कलम 368 अंतर्गत, कायद्याच्या दुरुस्तीसाठी संसदेतील दोन-तृतियांश खासदारांच्या मतदारांची गरज असते’.

दरम्यान, डीएमके यांच्यायकडे लोकसभेत 22 खासदार आहेत. तर राज्यसभेत 8 खासदार आहेत. हे विधयेक मंजूर करण्यासाठी डीएमके पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. केंद्राच्या या विधेयकानुसार, राज्यातील प्रतिनिधित्व प्रमाण कायम राहणार आहे. तसेच प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा एकसमान 50 टक्के वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे लोकसभेतील सदस्यांची कमाल संख्या 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us