ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, त्या एका निर्णयामुळे अमेरिकेत खळबळ, आता भारतावरील टॅरिफ रद्द करावा लागणार?

डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं, त्यांनी अनेक देशांवर टॅरिफ लावला, मात्र आता त्याच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. आता लवकरच भारतावरील टॅरिफ मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, त्या एका निर्णयामुळे अमेरिकेत खळबळ, आता भारतावरील टॅरिफ रद्द करावा लागणार?
donald trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 20, 2026 | 9:48 PM

अमेरिकेतून मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरु केलं होतं. जो देश आपल्या धोरणाविरोधात जाईल त्यावर त्यांनी टॅरिफचं आस्त्र उगारलं होतं. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून भारतावर देखील 50 टक्के कर लावण्याची घोषणा त्यांनी केली होती, भारत, चीन, ब्राझीलसह जगातील अनेक देशांवर त्यांनी टॅरिफ लावला, या टॅरिफमुळे इतर देशांचं तर नुकसान झालं, पण अमेरिकेचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, दरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांना टॅरिफच्या मुद्द्यावर मोठा धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ लावण्याचा निर्णय हा अवैध आणि बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आह. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये म्हटलं आहे की, अमेरिकेने आपल्या व्यापारी भागीदार असलेल्या देशांवर राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून टॅरिफ लावला, मात्र ट्रम्प यांची ही कृती बेकायदेशीर आहे. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावून आपल्या अधिकारांचं उल्लंघन केलं आहे, असं निरीक्षण देखील हाय कोर्टानं नोंदवलं आहे.

दरम्यान ऑगस्टमध्ये अमेरिकेमधील अपील कोर्टाने देखील ट्रम्प यांचा टॅरिफ लावण्याचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ट्रम्प यांच्याकडून अपील कोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं, मात्र आता सुप्रीम कोर्टाने देखील डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे, हा ट्रम्प यांच्यासाठी अत्यंत मोठा झटका मानला जात आहे. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या -ज्या देशांवर टॅरिफ लावला आहे, तो रद्द करण्याचा निर्णय अमेरिका घेण्याची शक्यता आहे, भारतावरील टॅरिफ देखील आता मागे घेतला जाऊ शकतो.

दरम्यान सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.  सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अपमानकारक आहे, परंतु त्यावर देखील माझ्याकडे बी प्लान तयार आहे, असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे.