मतदानाच्या वाढत्या अंतिम आकडेवारीवरुन विरोधकांना शंका, राष्ट्रपतींची घेणार भेट

लोकसभेच्या मतदानाच्या वाढत्या अंतिम आकडेवारीवरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण सगळीकडेच शेवटी टक्केवारी वाढतांना दिसत आहे. त्यासाठीच इंडिया आघाडीचे नेते उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

मतदानाच्या वाढत्या अंतिम आकडेवारीवरुन विरोधकांना शंका, राष्ट्रपतींची घेणार भेट
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 10:11 PM

Loksabha election 2024 : लोकसभेच्या मतदानाचे आतापर्यंत 3 टप्पे पार पडले आहेत. मात्र मतदानाच्या वाढत्या अंतिम आकडेवारीवरुन विरोधकांनी सवाल केलेत. आधीची आकडेवारी आणि सुधारित आकडेवारीत 10 टक्क्यांची वाढ कशी होऊ शकते ?, असा सवाल विरोधकांचा आहे. त्यासाठीच इंडिया आघाडीचे नेते उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. मतदानाची अंतिम आकडेवारी कशी काय वाढत चालली, असा सवाल महाविकास आघाडीनं केलाय.

संध्याकाळी 5 वाजताची आकडेवारी आणि अंतिम आकडेवारीत 10 टक्क्यांचा फरक कसा काय पडतो. एवढं मतदान कसं वाढतं, असे प्रश्न राऊत आणि पटोलेंनी केले आहेत. त्यासाठीच इंडिया आघाडी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंची भेट घेणार आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर, आतापर्यंत मतदानाचे 3 टप्पे पार पडले आहेत.

पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला आधी 54.34 टक्के मतदानाचा आकडा आयोगानं जारी केला. नंतर 11 दिवसांनी सुधारित आकडेवारी देत आयोगानं सांगितलं की, 63.71 टक्के मतदान झालं. इथं 9.37 टक्क्यांनी फरक पडला.

दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 53.71टक्के मतदानाचा आकडा आयोगानं सांगितला. नंतर 4 दिवसांनी अंतिम आकडेवारी आयोगानं सांगितली 62.71 %. म्हणजेच फरक पडला 9 % मतदानाचा

तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी होती 53.40 % आणि रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी निवडून आयोगानं अंतिम आकडेवारी दिली. त्याप्रमाणं 61.44 % मतदान झालं. म्हणजेच फरक आहे 8.04 %.

एक दिवसआधीच महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. एकूण 11 लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदानावर एक नजर टाकुयात.

  • बारामतीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 45.68% मतदान होतं आणि अंतिम आकडेवारी आयोगानं 56.07 % इतकी दिली म्हणजेच 10.39 % मतदानात भर पडली.
  • कोल्हापुरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 63.71 % मतदान झालं. अंतिम मतदानाची टक्केवारी झाली 70.35 %. म्हणजेच 6.64 % मतदानात भर पडली.
  • माढ्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 50% मतांची नोंद झाली. अंतिम मतदान झालं, 62.17 %. मतदानात भर पडली 12.17 %
  • रायगडमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 50.31% मतदान झालं. अंतिम मतदानांची आकडेवारी आहे 58.10%…म्हणजेच 7.79 % अधिक मतदानाची भर पडली.
  • सोलापूरमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 49.17% मतदानाची नोंद होती…अंतिम मतदानानंतर ही आकडेवीर पोहोचली. 57.61 टक्क्यांवर…म्हणजेच 8.44 % अधिक मतदानाची भर पडली.
  • सांगलीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.56% मतांची नोंद झाली…अंतिम टक्केवारी झाली 60.95 %..म्हणजेच 8.44 % अधिक मतदानाची भर 8.39
  • साताऱ्यात लोकसभेत 5 वाजेपर्यंत 54.11% मतदान झालं…अंतिम आकडेवारी 63.05 % इतकी आहे….8.94% मतदानाची भर पडली.
  • रत्नागिरी-सिंधुदुर्गात 5 वाजेपर्यंत 53.75% मतदान होतं..अंतिम टक्केवारी 59.23 % आहे…5.48 % मतदानाची भर पडली.
  • हातकणंगलेत 5 वाजेपर्यंत 62.18% मतदान झालं…अंतिम आकडेवारी आहे 68.07 % ….5.89% मतदानाची भर पडली.
  • धाराशीवमध्ये 5 वाजेपर्यंत 52.78% टक्के मतदान झालं…अंतिम आकडेवारी आहे 60.91%…8.13 % मतदानाची भर पडली.
  • लातूर 5 वाजेपर्यंत 55.38% मतदान..अंतिम टक्केवारी आहे 60.18%…4.8 % मतदानाची भर पडली.

बऱ्याच ठिकाणी मतदान 6 वाजेनंतरही सुरुच असतं, त्यामुळं ती आकडेवारी कुठं जाणार असं भाजपचं म्हणणंय. तर विरोधकांनी शंका उपस्थित करत राष्ट्रपतींचं दार ठोठावण्याचा निर्णय घेतलाय.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.