AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनापेक्षा इबोला अत्यंत धोकादायक, 900 पैकी 223 जणांचा मृत्यू, तब्बल..

Ebola Virus Outbreak: कोरोनापेक्षाही घातक व्हायरल जगात थैमान घालत आहे. कोरोनापेक्षा कितीतरी जास्त पट या व्हायरलचा मृत्यूदर आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून काही उपायोजना आखल्या जात आहेत. महत्वाची बैठकही दिल्लीत झाली.

कोरोनापेक्षा इबोला अत्यंत धोकादायक, 900 पैकी 223 जणांचा मृत्यू, तब्बल..
Ebola
| Updated on: May 30, 2026 | 2:44 PM
Share

कोरोनानंतर जगावर पुन्हा एकदा मोठे संकट आहे. आणखी एक घातक विषाणू पसरला आहे. ज्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. इबोला विषाणू आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडा या देशांमध्ये वेगाने पसरत आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. भारतातही या विषाणूचा एक रूग्ण आढळला. ही महिला युगांडाहून बंगलोरमध्ये दाखल झाली. तिच्यात इबोला विषाणूचे लक्षणे होती. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. इबोलाचा हा नवीन प्रकार उदयास आला आहे. धक्कादायक म्हणजे हा रोग चक्क घामातूनही पसरतो. दिवसेंदिवस या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनानंतर हा विषाणू पसरत आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनापेक्षा अधिक वेगाने हा पसरत आहे. शिवाय इबोला या विषाणूमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

तज्ज्ञांचे मत आहे की, हा विषाणू वेगाने पसरत आहे. सध्या त्यावर कोणतीही पूर्णपणे मान्यताप्राप्त लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. इबोलाचा हा नवीन प्रकार अत्यंत भयानक आहे. आतापर्यंत 900 हून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. त्यात 233 जणांचा बळी गेला.

भारतात या व्हायरलचा पहिला रूग्ण सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. दिल्लीमध्ये त्याबाबत महत्वाची बैठक झाली. डॉक्टरांच्या मते, इबोला विषाणू कोरोना विषाणूपेक्षा अधिक प्राणघातक आहे. कोरोना विषाणूचा मृत्यूदर खूपच कमी होता. इबोलाच्या जवळपास निम्म्या रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.  अहवालानुसार, 50 टक्के लोकांचा या आजारात मृत्यू होत आहे.

केंद्र सरकारने खबरदारी वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयाने काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना जारी केली आहे. विमान कंपन्यांना काही सूचना जारी केल्या आहेत. इबोला प्रतिबंधक लस आणि अँटीबॉडीज विकसित करण्यात भारतीय शास्त्रज्ञ आणि औषध कंपन्या काम करत आहेत. मात्र, हा व्हायरल दिवसेंदिवस अधिक घातक बनत आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा