AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, डीएत झाली इतकी वाढ, पगार किती वाढणार पाहा

केंद्र सरकारने प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA ) २ टक्क्यांची वाढ सकेली आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढून ६० टक्के झाला आहे. शनिवारी केंद्रीय कॅबिनेटने या वाढीला मंजूरी दिली आहे.

केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, डीएत झाली इतकी वाढ, पगार किती वाढणार पाहा
DA Hike Update
| Updated on: Apr 18, 2026 | 4:18 PM
Share

DA Hike: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठा दिलासा देत महागाई भत्ता म्हणजे डीएत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही वाढ केवळ २ टक्के आहे. परंतू दीर्घकाळानंतर आलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा मानला जात आहे. गेल्या काही काळापासून कर्मचारी संघटना सतत सॅलरी स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल करण्याची मागणी करत होते. खास करुन आठव्या वेतन आयोगासंदर्भात आशा वाढल्या होत्या. त्याच दरम्यान आता डीए वाढीचा निर्णय आला आहे.

डिटेल्स टक्केवारी ( %)
आधीचा महागाई भत्ता 58%
वाढ +2%
नवा महागाई भत्ता60 %

२% DA वाढीला मिळाली मंजूरी

केंद्रीय कॅबिनेटने शनिवारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात २ टक्के वाढीला मंजूरी दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थोडी वाढ होणार आहे. मात्र, ही वाढ मर्यादित मानली जात आहे. कारण कर्मचारी दीर्घकाळापासून जास्त वाढीची अपेक्षा बाळगून होते.

८ व्या वेतन आयोगाची मागणी

कर्मचारी संघटनांनी सरकारकडून वेतनाच्या ढाच्यात मोठ्या बदलाची मागणी केली आहे. त्यांनी फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जर हा प्रस्ताव लागू झाला तर किमान वेतन १८ हजाराहून वाढून ६९,००० होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता म्हणजे डीएच्या घोषणेत यावेळी बराच उशीर झाल्याचे म्हटले जात आहे. सर्वसाधारणपणे सरकार जानेवारी ते जूनच्या अवधीसाठी डीएचा निर्णय होळीच्या आसपास मार्चमध्ये करत असते. परंतू यावेळी असे झाले नाही. गेल्या १० वर्षात पहिल्यांदा डीएची घोषणा एप्रिलच्या महिन्यात करण्यात आली आहे. या आधी ऑक्टोबरमध्ये डीए ५५ टक्के वाढवून ५८ टक्के केला होता, जो एक जुलै २०२५ पासून लागू झाला होता.

बेसिक वेतन संभाव्य मासिक पगार वाढ
18,000360
29,200 584
56,100 1,100+
2,50,000 5,000

किती वाढणार पगार ?

बेसिक पगाराच्या हिशेबाने महागाई भत्त्यातील वाढीचा परिणाम वेगवेगळ्या स्तरावर दिसणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन १८,००० रुपये आहे. त्याचा पगारात सुमारे ३६० रुपये प्रति महिना वाढ होईल.तर २९,२०० रुपये बेसिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्या सुमारे ५८४ रुपयांचा फायदा होईल. ५६,१०० रुपये बेसिक वेतन मिळणाऱ्यांच्या मासिक पगारात १,१०० रुपयांहून जास्त वाढ पाहायला मिळू शकतो. तर ज्यांचे बेसिक वेतन २,५०,००० रुपये आहे. त्यांच्या पगारात ५,००० रुपये महिना वाढू होऊ शकते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...