AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोटा मोजता मोजता मशीन जॅम…पाच बंगले नि 14 प्लॉट… 6 हजार पगार घेणाऱ्या इंजिनिअरकडे सापडले घबाड

Engineer Baikunthnath Behra found huge property: अवघा 6 हजार रुपये पगार घेणाऱ्या इंजिनिअरकडे कोट्यवधींची रोकड सापडली. त्याच्याकडे 5 बंगले आणि 14 प्लॉट सापडले. त्यामुळे दक्षता विभागाचे अधिकारीही चक्रावले. कोण आहे हा अभियंता?

नोटा मोजता मोजता मशीन जॅम...पाच बंगले नि 14 प्लॉट... 6 हजार पगार घेणाऱ्या इंजिनिअरकडे सापडले घबाड
अभियंत्याकडे सापडले घबाडImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 07, 2026 | 1:17 PM
Share

Engineer Baikunthnath Behra found huge property: ओडिशा राज्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. दक्षता विभागाने 55 वर्षांचा सहाय्यक कार्यकारी अभियंता बैकुंठनाथ बोहरा याच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणात धडक कारवाई केली आहे. त्याच्याकडील संपत्तीचा आकडा पाहून कारवाईला गेलेले अधिकारीही चक्रावले. छापा दरम्यान या अभियंत्याकडे दोन कोटी रुपये नगद, 300 ग्रॅमहून अधिकचे सोने, 13 महागडे भूखंड, पाच बंगले आढळले. बैकुंठनाथ बोहरा हा एकीकृत आदिवासी विकास संस्थेत(ITDA) सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून कंधमाळ जिल्ह्यातील बालीगुडा येथे कार्यरत आहे. त्याच्याकडे कोट्यवधीचे घबाड असल्याचे अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांपासून येत होत्या.

दक्षता विभागाची 9 ठिकाणी छापेमारी

भुवनेश्वरचे विशेष न्यायाधीशांनी संपत्तीचा शोध घेण्यासाठी मंजूर दिली होती. त्यानंतर दक्षता पथकाने भुवनेश्वर, बारीपदा, जाजपूर जिल्ह्यातील धर्मशाळा आणि बालीगुडा येथील नऊ ठिकाणी छापेमारी केली. त्यात व्यापक शोध मोहीम राबविण्यात आली. या पथकात दोन अतिरिक्त पोलीस अधिक्षक, पाच उप पोलीस अधिक्षक आणि सहा निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या छापेमारी दरम्यान दक्षता अधिकाऱ्यांनी भुवनेश्वर येथील चंद्रशेखरपूर येथील नीलाद्री विहारमधील एक चार मजली इमारत, शैलाश्री विहार येथील एक तीन मजली इमारत आणि पटिया येथील बैद्यनाथ मेमोरियल रुग्णालयाच्या जवळील कानन विहार फेज-I मधील एक दोन मजली इमारत अभियंत्याची असल्याचे समोर आले. तर बोहरा याच्याकडे 14 भूखंड असल्याचेही समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी जोरदार तपास सुरू केला. तेव्हा भुवनेश्वर येथील मोक्याच्या ठिकाणचे सात भूखंड आणि जाजपूर, बरईपाडासह अजून एका ठिकाणी उर्वरीत भूखंड असल्याची माहिती हाती लागली.

दोन कोटींची रोख रक्कम

या कारवाईदरम्यान बोहरा याचे आणि त्याच्या नातेवाईकांचे बँक लॉकर उघडण्यात आले. सर्व मिळून 2 कोटींपेक्षा अधिकची रोकड जप्त करण्यात आली. त्यापूर्वी त्याच्या घरात अधिकाऱ्यांना 2.66 लाख रुपये नगद सापडले. 300 ग्रॅमहून अधिकचे सोने, इतर दागिने, बँक खाते, पोस्ट ऑफिसमधील बचत, इतर मुदत ठेवी आणि इतर अनेक संपत्ती समोर आली. मोजदाद करताना अधिकारी थकले पण अजूनही त्याच्या अथवा इतरांच्या नावावर त्याने केलेल्या संपत्तीचा शोध सुरू आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंध विभागाच्या कारवाईत बैंकठुनाथ बेहरा याची चंद्रशेखरपूर येथे एक आणि दोन मजली घर सापडले आहे. तर जाजपूर जिल्ह्यातील धर्मशाळा भागात पाना या त्याच्या मुळ गावी त्याने बांधलेले दोन मजली घरही समोर आलेले आहे. याशिवाय बारीपदा आणि पांडुआ येथे त्याच्या नातेवाईकाकडे त्याने ठेवलेल्या बेहिशोबी संपत्तीचा शोध आहे. अवघ्या सहा हजार रुपये पगार घेणारा हा अभियंता इतके घबाड एकटाच कसे जमवू शकतो असा सवाल विचारल्या जात आहे. त्याला मदत करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात