तुमच्या PF खात्यातील पैशांवर संकट येऊ शकतं, EPFO कडून खातेधारकांना अलर्ट

कोणत्याही क्षेत्रात नोकरी करत असलेल्या व्यक्तीसाठी त्याचा निर्वाह निधी म्हणजेच प्रोव्हिडन्ट फंड (Important instructions about Provident Fund) अत्यंत महत्वाचा असतो.

तुमच्या PF खात्यातील पैशांवर संकट येऊ शकतं, EPFO कडून खातेधारकांना अलर्ट

मुंबई : कोणत्याही क्षेत्रात नोकरी करत असलेल्या व्यक्तीसाठी त्याचा निर्वाह निधी म्हणजेच प्रोव्हिडन्ट फंड (Important instructions about Provident Fund) अत्यंत महत्वाचा असतो. भविष्यात आर्थिक सुरक्षितता राहावी यासाठी ही रक्कम प्रत्येकाच्याच पगाराच्या तुलनेत पीएफ खात्यात जमा होते. सोबतच जमा रकमेवर व्याजही मिळते.

मात्र, तुमच्या एका छोटीशा चुकीमुळे भविष्याची तरतुद असलेली ही पीएफ रक्कम संकटात सापडू शकते. असं होऊ नये म्हणून कर्मचारी ​भविष्य निधी संघटना (EPFO) वेळोवेळी ग्राहकांना काही अलर्ट देते. यात अनेक गोष्टींची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

आपल्या ग्राहकांना दिलेल्या अलर्टमध्ये EPFO ने कोणत्याही फसव्या कॉलपासून सावध राहण्यास सांगितले आहे. ईपीएफओने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे, ”ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार नंबर, पॅन नंबर किंवा बँकेचे तपशील मागत नाही. EPFO आपल्या खातेधारकांना कधीही फोन कॉल करत नाही.”

ईपीएफओच्या या स्पष्ट सुचनांनंतर खातेधारकांनी अशा कोणत्याही फसव्या फोन कॉलपासून सावध राहणे आवश्यक आहे. यासोबतच ईपीएफओने त्यांच्या नावाने सुरु असलेल्या फेक वेबसाईटपासूनही सावध राहण्यास सांगितले आहे. ईपीएफओची एकमेव अधिकृत वेबसाईट https://www.epfindia.gov.in ही आहे.

ईपीएफओच्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान

ईपीएफओच्या सुचनांकडे खातेधारकांनी दुर्लक्ष केल्यास याची संबंधित ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागू शकते. एखाद्या छोट्याशा चुकीने देखील मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागू शकतो. असं झाल्यास अनेक वर्षांची तुमची बचत क्षणात गमावली जाऊ शकते. सध्या ईपीएफओमध्ये 6 कोटीहून अधिक खातेधारक आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *