AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : एवढा आटापिटा करूनही डोनाल्ड ट्रम्प यांचं शांततेच नोबेल का हुकलं? हीच ती 3 कारणं

शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची अखेर आज घोषणा झाली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे, एवढे प्रयत्न करूनही त्यांना नोबेल पुरस्कार मिळू शकलेला नाहीये.

Explainer : एवढा आटापिटा करूनही डोनाल्ड ट्रम्प यांचं शांततेच नोबेल का हुकलं? हीच ती 3 कारणं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2025 | 3:55 PM
Share

शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची अखेर आज घोषणा झाली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे, आपल्याला शांततेचं नोबेल मिळावं यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड प्रयत्न केले, रशिया, युक्रेन युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी गाझा आणि इस्रायलमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबवलं. मात्र एवढं करून देखील त्यांना नोबेल पुरस्कारानं हुलकावणी दिली आहे. व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचादो यांना यावर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा पुरस्कार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, अनेक दावे केले मात्र तरी देखील डोनाल्ड ट्रम्प हे शांततेचा नोबेल जिंकू शकले नाहीत. त्यांनी आपण अनेक युद्ध थांबवली आहेत, असा दावा देखील केला, मात्र तरी देखील त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही. ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार न मिळण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत.

तज्ज्ञांच्या मते ज्यांच्या प्रयत्नांचे चिरस्थायी आणि परिवर्तनकारी परिणाम होतात, त्यांचा प्रामुख्यानं नोबेल पुरस्कार देण्यासाठी नोबेल कमिटी विचार करते. ट्रम्प यांना शांततेचं नोबेल न मिळण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ते या पुरस्कारासाठी असलेले जे मापदंड आहेत ते पूर्ण करू शकले नाहीत. जेव्हा नोबेल कमिटी एखाद्या व्यक्तीचा या पुरस्कारासाठी विचार करते तेव्हा पहिली अट ही असते की त्या व्यक्तीने जे शांततेसाठी प्रयत्न केले आहेत, ते चिरकाल असले पाहिजेत, तसेच अशा व्यक्तीने जगात बंधुता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प हा पामदंड पूर्ण करू शकले नाहीत, कारण जगातील अशा अनेक संस्था आहेत, ज्यांच्याप्रती डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यवहार हा पक्षपातीपणाचा राहिला आहे, तसेच जागतिक हवामान बदलाच्या समस्येसाठी संपूर्ण जगभरातून प्रयत्न सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र त्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

हेनरी जॅक्सन सोसायटीचे इतिहासकार आणि संशोधक थिओ जेनो यांनी सांगितलं की, डोनाल्ड ट्रम्प यांनी जे शांततेसाठी प्रयत्न केले ते चिरकालतेच्या कसोटीवर उतरताना दिसत नाहीत. तात्पुरत्या स्वरुपात एखादं युद्ध थांबवणं आणि युद्धच होऊ नये यासाठी प्रयत्न करणं यात प्रचंड अंतर आहे. मात्र ट्रम्प यांच्याकडून केवळ हे युद्ध थांबवण्याचा दावा करण्यात आला, मात्र युद्धच होऊ नये यासाठी प्रयत्न झालेले दिसत नाहीत. मागच्या काही वर्षांमध्ये ज्यांना -ज्यांना शांततेचा नोबेल मिळाला आहे, त्यांची यादी पहा त्यामध्ये त्यांनी समस्येवर तात्पुरत्या स्वरुपात उपाय शोधलेला नाहीये, तर त्यावर कायम स्वरुपी उपाय योजना काय करता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प या मापदंडामध्ये कुठेही बसत नाहीत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार नोबेल पुरस्कार मलाच मिळणार असा दावा करण्यात येत होता, मात्र असा वारंवार दावा करणं देखील त्यांच्याविरोधात गेलं. तज्ज्ञांच्या मते नोबेल कमिटी कधीही राजकीय दबावापुढे झुकत नाही, त्यामुळे ट्रम्प यांनी वारंवार असा दावा केल्यानंतरही त्यांना जर हा पुरस्कार देण्यात आला असता तर जगभरात एक वेगळा संदेश गेला असता त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही.

Follow Us
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.