AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात पेटवलेली शेकोटी ठरली शेवटची, आई-वडिलांसह कुशीतच चिमुकल्याचाही मृत्यू

थंडीपासून वाचण्यासाठी एका कुटुंबाने घरात शेकोटी पेटवली आणि झोपून गेले. पण...!

घरात पेटवलेली शेकोटी ठरली शेवटची, आई-वडिलांसह कुशीतच चिमुकल्याचाही मृत्यू
| Edited By: | Updated on: Jan 21, 2021 | 12:58 PM
Share

फरीदाबाद : काळजाचा ठोका चुकवणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशभरात सध्या कडाक्याची थंडी आहे. थंडीपासून वाचण्यासाठी एका कुटुंबाने घरात शेकोटी पेटवली आणि झोपून गेले. पण यामुळे गुदमरून आई-वडिलांसह एका 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सगळेच या प्रकरणावर हळहळ व्यक्त करत आहेत. (faridabad news family sleeping by burning bonfire husband and wife including 6 year old child died of suffocation)

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या फरीदाबादमधील ही घटना आहे. इथं सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यापासून वाचण्यासाठी एका कुटुंबाने घरात शेकोटी पेटवली आणि झोपून गेले. घराच्या दारं-खिडक्या बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला आणि संपूर्ण कुटुंबाचाच गुदमरून मृत्यू झाला. यामध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या 6 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय पती अमन, 21 वर्षीय पत्नी प्रिया आणि 6 वर्षांचा मुलगा मानवी अशी मृतांची नावं आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे.

अमन त्याची पत्नी प्रिया आणि 6 वर्षाचा मुलगा मानव यांच्यासह भाड्याच्या घरात राहत होता. सेक्टर -24 मध्ये असलेल्या खासगी कंपनीत तो काम करायचा. मंगळवारी रात्री थंडीमुळे हे लोक खोलीत शेकोटी पेटवून झोपले. ही त्यांची शेवटची झोप ठरली.

गुदमरल्यामुळे तिघांचाही मृत्यू

रात्री पेटवलेली शेकोटी घराबाहेर न ठेवल्यामुळे तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. बुधवारी सकाळी जेव्हा घराच्या मालकाने दार ठोठावलं तेव्हा त्याला काहीच उत्तर मिळालं नाही. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी माहिती मिळताच दरवाजा तोडला आणि अमन, पत्नी प्रिया, मुलगा मानव यांचं मृतदेह आढळले. (faridabad news family sleeping by burning bonfire husband and wife including 6 year old child died of suffocation)

संबंधित बातम्या – 

आधी मुंबई लोकलमधून पालघरला परतला, आता शार्दूल ठाकूर मुंबई विमानतळावरुन कुठे गेला?

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण

(faridabad news family sleeping by burning bonfire husband and wife including 6 year old child died of suffocation)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...