AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सणासुदीच्या काळात विमान तिकीटांमध्ये 68 टक्क्यांपर्यंत वाढ, दिवाळीनंतर तरी प्रवाशांना पुन्हा मिळणार का सुट?

ऐन दिवाळीच्या तोंडावर विमान कंपन्यांनी तिकिट दरांमध्ये मोठी वाढ केली. ज्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना धक्का बसला. इराण आणि अमेरिका युद्धात तेलाच्या किंमत वाढत असतानाही तेल कंपन्यांनी मोठी वाढ तिकिट दरात केली होती.

सणासुदीच्या काळात विमान तिकीटांमध्ये 68 टक्क्यांपर्यंत वाढ, दिवाळीनंतर तरी प्रवाशांना पुन्हा मिळणार का सुट?
Flight Ticket
| Updated on: Oct 22, 2026 | 5:32 PM
Share

आागामी काळातील सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात प्रचंड वाढ केली असून काही मार्गांवर ती 50 टक्के पेक्षा जास्त असेल. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भारतात हे वाढलेले तिकीट दर लवकर कमी होण्याची शक्यता नाही. भारतातील सर्वात महत्वाचा आणि मोठा असलेला दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर आला असताना विमान तिकीटांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दिल्ली-हैदराबाद मार्गावर तर ती वाढ 68 टक्के एवढी असेल. याशिवाय मुंबई-कलकत्ता 51 टक्के, दिल्ली-गोवा 39 टक्के आणि मुंबई-बेंगळूर मार्गावर ही वाढ 37 टक्के असणार आहे. विशेष म्हणजे हे वाढलेले दर दिवाळीनंतरही कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे.

त्याचे कारण म्हणजे, ऑक्टोबर महिन्यात वाढवलेले विमान इंधनाचे दर. क्रेडिट रेटींग एजन्सी आयसीआरएच्या अहवालानुसार, विमान प्रवासाच्या दरात झालेली वाढ ही इंधनाच्या दरवाढीमुळे झाली आहे. तर इंधन दरवाढ ही डॉलरच्या तुलनेत रूपयाची कमजोरी आणि पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्षामुळे झाल्याचे आयसीआरएने सांगितले.

तीन महत्वाची कारणे ज्यामुळे हवाई प्रवास महागला

1. विमान प्रवास दरात वाढ होण्यामागचे सर्वात महत्चाचे कारण एटीएफ म्हणजे विमान इंधनाच्या दरातील वाढ होय. 1 ऑक्टोबर नंतर साधारणतः 16 रूपये प्रती लिटर वाढ झाल्यानंतर एटीएफ 137 रूपयांवर पोहचलंय. 2. डॉलरच्या तुलनेत रूपयाची असलेली कमजोरी कारण विमान कंपन्यांचे 30 ते 50 टक्के खर्च डॉलरमध्ये होतो. 3. पश्चिम आशियातील वाढलेला संघर्ष ज्यामुळे अनेकवेळा कंपन्यांना मार्ग बदलावा लागतोय आणि खर्च वाढतोय.

विमान प्रवासाच्या या सगळ्या वाढत्या महागाईवर सरकारचे लक्ष असून ते डीजीसीएच्या अंतर्गत काही नियम बनवत आहेत. ते नियम जारी झाल्यानंतर यात अजून स्पष्टता येण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढताना दिसल्या. त्यावेळी भारतीय विमान कंपन्यांनी तिकिट दरात मोठी वाढ केली. त्यानंतर आता पुन्हा वाढ होत आहे. ज्यामुळे दिवसेंदिवस विमानाच्या तिकिटाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. विमानाच्या प्रवासासाठी आता ज्यादाचे पैसे मोजावी लागणार आहेत.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ