AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीजेपीच्या आंदोलनात ट्विस्ट, भाजपचा माजी प्रदेशाध्यक्ष समर्थनात मैदानात उतरला; थेट सरकारच्या…

सीजेपीच्या आंदोलनात ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष हे सीजीपेच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत. त्यानी थेट सरकारला आव्हान दिलं आहे.

सीजेपीच्या आंदोलनात ट्विस्ट, भाजपचा माजी प्रदेशाध्यक्ष समर्थनात मैदानात उतरला; थेट सरकारच्या...
cjp protestImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 20, 2026 | 6:47 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाची हाक देणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर दिल्ली पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आशुतोष रांका, सौरभ दास यांना अटक देखील केली आहे. सीजेपी नेत्यांच्या याच कारवाईवरून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

भाजपचे तामिळनाडू माजी प्रदेशाध्यक्ष आणि ‘वी द लीडर्स’ आंदोलनाचे संस्थापक के अन्नामलाई यांनी दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. तसेच दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर देखील भूमिका स्पष्ट केली. अन्नामलाई यांनी म्हटलं की, सीजेपी आंदोलनाशी पूर्णपणे सहमत नाही. परंतु निवडणूक आयोगावर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर सहमत आणि समर्थन आहे’.

आता सीजेपी नेत्याची ताकद आणखी वाढेल

अन्नामलाई यांनी सीजेपी नेत्याच्या अटकेवरून दिल्ली पोलिसांना अनेक सवाल केले. अन्नामलाई म्हणाले, ‘मला देशातील कायदा-व्यवस्थेची भीती आणि चिंता वाटू लागली आहे.  मला असं वाटत आहे की, दिल्ली पोलिसांनी कायदा हातात घेतला आहे. माझा सीजेपीच्या आंदोलनाच्या पद्धतीला पाठिंबा नाही. परंतु ते निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत आहेत, त्याला माझा पाठिंबा आणि समर्थन आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तर दिलं पाहिजे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करून तुरुंगात धाडल्याने सीजेपी नेत्यांची ताकद आणखी वाढेल. दिल्ली पोलीस देश आणि संपूर्ण व्यवस्थेचं नुकसान करत आहे.

आमच्यावर अन्याय होता कामा नये…

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरील वक्त्यावर देखील अन्नामलाई यांनी भाष्य केलं. अन्नामलाई यांनी दक्षिण भारतातील राज्यांच्या हिताचा आणि त्यांचा बचावाचा पवित्रा घेतला. तर भाजप सोडलेल्या अन्नामलाई यांनी पुढे म्हटलं की, भारताला मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची आवश्यकता आहे. परंतु ती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी.  कारण दक्षिणेतील राज्यातील लोकसंख्या नियंत्रणात ठेवली आहे. त्यामुळे या विधेयकाच्या माध्यमातून दक्षिणेतील राज्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये’.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!