Shibu Soren Death : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन

Shibu Soren Death : झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज सोमवारी सकाळी निधन झालं. ते दीर्घकाळापासून आजारी होते.

Shibu Soren Death :  झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन
Shibu Soren Death
| Updated on: Aug 04, 2025 | 10:41 AM

झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज सोमवारी सकाळी निधन झालं. ते दीर्घकाळापासून आजारी होते. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गुरुजी आपल्या सर्वांना सोडून निघून गेले अशा शब्दात झारखंडचे मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा हेमंत सोरेन यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज सकाळी 8:48 वाजता निधन झालं. गंगाराम रुग्णालयात नेफ्रोद डिपार्टमेंटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना किडनीशी संबंधित समस्या होती. त्याशिवाय प्रकृतीच्या आणखी सुद्ध समस्या होत्या. ते 81 वर्षांचे होते.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन वडिलांच्या निधनाची माहिती दिली. ‘आदरणीय दिशोम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेलेत. आज मी शुन्य झालोय’


24 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं

शिबू सोरेन यांच्यावर दीर्घकाळापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना 24 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. “त्यांना नुकतच रुग्णालयात दाखल करण्यात आलय. आम्ही त्यांना पहायला आलोय. प्रकृती स्वस्थासाठी त्यांच्या तपासण्या सुरु आहेत” असं हेमंत सोरेने म्हणाले होते.

तीनवेळा मुख्यमंत्री बनले

शिबू सोरेन हे झारखंड राज्य बनवण्यात आघाडीवर होते. त्यांचे प्रशंसक त्यांना गुरुजी म्हणून बोलवायचे. तीनवेळा ते झारखंडचे मुख्यमंत्री बनले. एकदाही ते आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. बिहारापासून वेगळ्या झालेल्या झारखंडचे ते 2005 साली तिसरे मुख्यमंत्री बनले. 2005 साली आपल्या पहिल्या कार्यकाळादरम्यान ते फक्त 10 दिवस, 2008 साली दुसऱ्या कार्यकाळात एक वर्ष आणि तिसऱ्या कार्यकाळात काही महिने मुख्यमंत्री राहिले.

पहिल्या लोकसभा निवडणुकीत पराभव

झारखंडच मुख्यमंत्रीपद भूषवण्याशिवाय ते केंद्राच्या राजकारणातही यशस्वी ठरले. 1980 साली ते पहिल्यांदा खासदार बनले. 1977 साली पहिल्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. पण दुमकामध्ये त्यांचा पराभव झाला.

राजकीय करिअर

1980 साली त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. दुमका येथून ते पहिल्यांदा खासदार बनले. त्यानंतर 1986, 1989, 1991 आणि 1996 ते सलग जिंकत राहिले. 1998 च्या निवडणुकीत भाजपचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी त्यांचा पराभव केला. 1999 च्या निवडणुकीत त्यांनी पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवलं. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2004, 2009 आणि 2014 मध्ये ते दुमकामधूनच विजयी झाले.

एकूण मिळून 8 वेळा ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. त्याशिवाय शिबू सोरेन केंद्रात नरसिम्हा राव आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री बनले. केंद्रात तीनवेळा ते कोळसा मंत्री राहिले.