AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेश विसर्जन करून मंडपात झोपले, 8 जणांवर विजेचा तार पडला, 4 जणांचा जागीच मृत्यू!

शुक्रवारी रात्री गणेशमूर्तीचे विसर्जन करून मंडळाचे सदस्य हिरापूर गावातील मंडपात परतले होते. विसर्जनामुळे थकवा आल्याने आठ तरुण मंडपातच जमिनीवर झोपले होते. परंतु शनिवारी पहाटे सुमारे 5 वाजता परिसरातील वीजपुरवठा सुरू झाला. त्याचवेळी वीजेच्या खांबावरील तार तुटून तो थेट मंडपात झोपलेल्या तरुणांच्या अंगावर पडला.

गणेश विसर्जन करून मंडपात झोपले, 8 जणांवर विजेचा तार पडला, 4 जणांचा जागीच मृत्यू!
ganesh visarjan deathImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 5:33 PM
Share

Ganesh Visarjan Death : सध्या महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवादरम्यान एकूण दहा दिवसांत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेश मंडळांनी आकर्षक देखावे उभारले होते. परराज्यातही बाप्पाची स्थापना करून हा उत्सव साजरा करण्यात आला. परंतु मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे विजेची तार तुटून पडल्याने तब्बल 8 जणांना विजेचा धक्का बसला. यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

नेमकं काय घडलं?

ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील मंडाला जिल्ह्यातील हिरापूर गावात गणेश मंडपात एकूण आठ तरुण झोपले होते. झोपेत असतानाच पहाटेच्या सुमारास त्यांच्या अंगावर विजेचा तार तुटून पडला. या दुर्घटनेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य काही तरुण जखमी झाले आहेत. घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

तार तुटल्यामुळे शॉर्टसर्किट झाले नंतर…

शुक्रवारी रात्री गणेशमूर्तीचे विसर्जन करून मंडळाचे सदस्य हिरापूर गावातील मंडपात परतले होते. विसर्जनामुळे थकवा आल्याने आठ तरुण मंडपातच जमिनीवर झोपले होते. परंतु शनिवारी पहाटे सुमारे 5 वाजता परिसरातील वीजपुरवठा सुरू झाला. त्याचवेळी वीजेच्या खांबावरील तार तुटून तो थेट मंडपात झोपलेल्या तरुणांच्या अंगावर पडला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तार तुटल्यामुळे शॉर्टसर्किट झाले असावे. त्यातच पावसामुळे परिसरात आणि जमिनीवर ओलावा असल्याने विजेचा प्रवाह अधिक धोकादायक ठरला. जमिनीवर झोपलेल्या तरुणांना विजेचा जोरदार धक्का बसला.

तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

तार कोसळळ्यानंतर मंडपात एकच आरडाओरड सुरू झाली. या दुर्घटनेत जैनू भंवरे (19), रवि झरिया (24), कृष्णा कुमार भंवरे (18) आणि वीरेंद्र भंवरे (24) यांचा जागीच मृत्यू झाला. काही जणांनी प्रसंगावधान राखत तेथून बाजूला होऊन आपला जीव वाचवला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अन्य एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच एसडीएम आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून दुर्घटनेमागील नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. वीजपुरवठा आणि तांत्रिक बाबींचीही चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे हिरापूर गावात हळहळ व्यक्त होत असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?