AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकर लग्न करा, आम्ही वाट पाहतोय…जुन्या दिल्लीत राहुल गांधींना कोणी केली विनंती ?

राहुल गांधी यांनी दीपावलीच्या निमित्ताने जुन्या दिल्लीतील घंटेवाला मिठाईच्या दुकानात इमरती आणि लाडू बनवण्यास केली मदत, यावेळी दुकानदाराने त्यांना विचारले लग्न कधी करताय...

लवकर लग्न करा, आम्ही वाट पाहतोय...जुन्या दिल्लीत राहुल गांधींना कोणी केली विनंती  ?
Rahul Gandhi
| Updated on: Oct 20, 2025 | 9:41 PM
Share

नई दिल्ली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना त्यांच्या विवाहाबद्दल अनेकदा विचारले जाते. मागे एकदा तर त्यांची आई सोनिया गांधी यांनाही राहुल गांधी यांच्या लग्नाबद्दल विचारले होते. तेव्हा सोनिया गांधी यांनी त्यांना तुम्हीच राहुलला मुलगी शोधा अशी विनवणी केली होती. आता चक्क दिल्लीतील एका मिठाईवाल्याने राहुल गांधी यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांच्या लग्नाचा विषय पुन्हा काढला आहे.

जुनी दिल्लीतील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानाच्या मालकाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिवाळीच्या निमित्ताने भेटताना लग्नाचा विषय काढला. दुकानदार म्हणाला आमच्या कुटुंबाच्या अनेक पिढ्या राहुल यांच्या कुटुंबियांना मिठाईची सेवा देत आल्या आहेत. आता आम्ही त्यांच्या लग्नाची वाट पाहात आहोत.

जुनी दिल्लीतील घंटेवाला मिठाईच्या दुकानाचे मालक म्हणाले की राहुल गांधी यांनी लवकर लग्न करायला हवे.त्यांच्या या मागणीवर राहुल गांधी काही म्हणाले नाहीत केवल हसले ! राहुल गांधी दिवाळीच्या निमित्ताने घंटेवाला मिठाईच्या दुकानात आले होते. तेथे त्यांनी काही मिठाई तयार करण्यात हातभारही लावला. राहुल गांधी यांनी याचा एक व्हिडीओ सोमवारी त्यांच्या युट्युब चॅनलवर पोस्ट केला.

या व्हिडीओत मिठाईच्या दुकानाचे मालकांना तुम्ही हे सांगताना ऐकू शकता, ‘ आम्ही तुमचे पणजोबा (जवाहरलाल नेहरू),आजी (इंदिरा गांधी),वडील (राजीव गांधी) आणि दिदी (प्रियंका गांधी) यांना मिठाईची सेवा दिली आहे.आता केवळ एकाच गोष्टीची वाट पाहात आहोत. तुम्हाला विनंती आहे लवकर लग्न करा. तुमच्या लग्नाची वाट पहात आहोत. सर्वात आधी तुम्ही लग्न करा. त्याची मिठाई देखील आमच्याकडूनच घ्या. आम्ही त्याची वाट पाहात आहोत.

राहुल गांधी यांनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही आणि केवळ हसले. लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, ‘जुन्या दिल्लीच्या प्रसिद्ध आणि ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानात इमरती आणि बेसनचे लाडू बनवण्यात हात आजमावला. शतकाहून जुन्या प्रतिष्ठीत दुकानाचा गोडवा आजही कायम आहे. खालीस, पारंपारिक आणि हृदयाला स्पर्श करणारी.’

त्यांचे म्हणणे आहे की दीपावलीचा असली गोडवा केवळ थाळीत नाही. तर नाती आणि समाजात देखील असतो. राहुल गांधी म्हणाले की तुम्ही सर्वांनी सांगा, तुम्ही दिवाळी कशी साजरी करत आहात आणि तिला कशाप्रकारे खास बनवत आहात ?’

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन.

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय?  काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी  म्हणाल्या की...

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन