मनोहर पर्रिकर यांना रक्ताची उलटी

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रक्ताची उलटी झाली आहे. मात्र, त्यांच्या छातीत कोणताही संसर्ग झालेला नाही, अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांनी दिली. 23 फेब्रुवारीपासून मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना एंडोस्कोपीसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पर्रिकर अनेक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर अमेरिकेत आणि नंतर …

मनोहर पर्रिकर यांना रक्ताची उलटी

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रक्ताची उलटी झाली आहे. मात्र, त्यांच्या छातीत कोणताही संसर्ग झालेला नाही, अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांनी दिली.

23 फेब्रुवारीपासून मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना एंडोस्कोपीसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पर्रिकर अनेक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर अमेरिकेत आणि नंतर दिल्लीतही उपचार करण्यात आले.

नाकात ऑक्सिजन नळी, तरीही पर्रिकर कामावर

जवळपास गेल्या एक वर्षापासून पर्रिकर आजाराशी झुंज देत आहेत. शिवाय गोव्याचं मुख्यमंत्रीपदही ते सांभाळत आहेत. त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. पण भाजपकडून या वृत्ताचं खंडण करण्यात आलं असून पर्रिकरांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय.

शेवटपर्यंत गोव्याची सेवा करेन; नाकातल्या ट्यूबसह पर्रिकर म्हणाले How’s The Josh?

पर्रिकरांवर अगोदर अमेरिकेत उपचार करण्यात आले आणि त्यानंतर दिल्लीतील एम्समध्येही त्यांच्यावर उपचार झाले. नुकतेच ते नियमित तपासणीसाठी दिल्लीला जाऊन आले आहेत. पण आता एंडोस्कोपीसाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आजारपणासोबतच ते गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचाही कार्यभार सांभाळत आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत गोवेकरांची सेवा करणार असल्याचं पर्रिकरांनी यापूर्वीच जाहीर केलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *