नाकात ऑक्सिजन नळी, तरीही पर्रिकर कामावर

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आजारपणामुळे खालावली आहे. मात्र तरिही पर्रिकरांची त्यांच्या कामावरील निष्ठा जराही कमी झालेली नाही. पर्रिकरांनी रविवारी जुवारी आणि मांडवी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला, तसेच तेथील अधिकाऱ्यांशी बातचीतही केली. गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे पर्रिकर यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. 14 ऑक्टोबर दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून गोव्यात परतल्यानंतर पर्रिकर हे …

नाकात ऑक्सिजन नळी, तरीही पर्रिकर कामावर

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आजारपणामुळे खालावली आहे. मात्र तरिही पर्रिकरांची त्यांच्या कामावरील निष्ठा जराही कमी झालेली नाही. पर्रिकरांनी रविवारी जुवारी आणि मांडवी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला, तसेच तेथील अधिकाऱ्यांशी बातचीतही केली.

गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे पर्रिकर यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. 14 ऑक्टोबर दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून गोव्यात परतल्यानंतर पर्रिकर हे त्यांच्या घरीच होते. जवळपास दोन महिन्यानंतर आज ते सार्वजनिकरित्या दिसून आले.


पर्रिकरांनी आपल्या खासगी निवासस्थानी कुंकळ्ळी येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या संकुलाची कोनशीला बसवल्याच्या नामफलकाचे अनावरण केले, यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. यासंबंधीचा एक फोटो पोस्ट करण्यात आला. यामध्ये पर्रिकर अशक्त दिसून येत आहेत, तसेच त्यांच्या नाकात ऑक्सिजन नळी दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत पर्रिकरांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशा शुभेच्छा दिल्या. तसेच लोक त्यांच्या कर्तव्यनिष्ठेकरिता त्यांची प्रशंसाही करत आहेत.

14 ऑक्टोबरनंतर पर्रिकर पहिल्यांदाच घराबाहेर निघाले. याआधी पर्रिकर हे उपचारासाठी अमेरिकेतही गेले होते. आजारपणातही ते आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पर्रिकरांच्या आजारपणाला बघता त्यांच्या कामाबाबत काँग्रेसने अविश्वास दाखवला होता. मुख्यमंत्री घेत असलेल्या प्रत्येक बैठकीचा पुरावा म्हणून व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसने केली होती. तेव्हापासून मुख्यमंत्री कार्यालयाकडून मनोहर पर्रिकर यांच्या कार्यक्रमाची प्रत्येक छायाचित्रे ट्विट केली जातात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *