Indian Rail : ट्रेनच्या AC डब्यात निवांत झोपली, उठून पाहते तर… हमसून रडणाऱ्या महिलेवर आभाळ कोसळलं, नेमकं काय घडलं?

Women Jewellary Stolen : रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. बॅगेतून अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 25 हजारांची रोकड चोरीला गेल्याचा दावा तिने केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने आपला अनुभव सांगितला आहे. या घटनेमुळे सरक्षित प्रवासाचा प्रश्न एरणीवर आला आहे.

Indian Rail : ट्रेनच्या AC डब्यात निवांत झोपली, उठून पाहते तर... हमसून रडणाऱ्या महिलेवर आभाळ कोसळलं, नेमकं काय घडलं?
Indian Railway Theft
Image Credit source: social media
| Updated on: Nov 03, 2026 | 9:32 PM

रेल्वेने प्रवास करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कितीही काळजी घेतली, तरी कधी कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल, याचा नेम नसतो. प्रवासादरम्यान सामानाची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव करून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही चोरी एखाद्या गर्दीच्या जनरल डब्यात किंवा स्लीपर कोचमध्ये झालेली नाही, तर चक्क फर्स्ट एसी (First AC) डब्यात घडली आहे. या घटनेत एका महिलेचे तब्बल अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 25 हजार रुपये रोख चोरीला गेले आहेत. संबंधित महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद विहार टर्मिनस-न्यू जलपाईगुडी एक्सप्रेसमधून एक महिला आपल्या मुलासोबत प्रवास करत होती. तिने प्रवासासाठी फर्स्ट एसी डब्याचे तिकीट काढले होते. मात्र, प्रवासादरम्यान तिच्या बॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली. चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास अडीच लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय बॅगेतील 25 हजार रुपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली.

Loading...

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर

या घटनेनंतर ‘अंशी’ (Anshi) नावाच्या खात्यावरुन ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पीडित महिला आपल्यासोबत घडलेल्या चोरीच्या घटनेची माहिती देताना दिसत आहे. प्रवासादरम्यान एवढ्या महागड्या डब्यातही आपले सामान सुरक्षित नसल्याची भावना या महिलेने व्यक्त केली आहे. या घटनेमुळे तिला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

रेल्वेच्या सुरक्षेवर उपस्थित केले प्रश्न

या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. फर्स्ट एसीसारख्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सामानही सुरक्षित नसेल, तर सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेची काय परिस्थिती असेल, असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. रेल्वे प्रवासात महागडे दागिने आणि रोख रक्कम सोबत नेताना प्रवाशांनी अधिक सावध राहण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us