AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजच सोने खरेदी करा, सोन्याचे भाव वाढणार, भारतीय बँकांकडून मोठा निर्णय, थेट आयात..

Gold-Silver Import : गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीचे भाव घसरताना दिसले. सोने आपल्या उच्चांकापेक्षा खूपच कमी झाले. मात्र, आता सोने आणि चांदीबद्दल अत्यंत मोठी बातमी पुढे येत आहे. ज्यानंतर सोने खरेदी करण्याचे स्वप्न बघण्याऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो.

आजच सोने खरेदी करा, सोन्याचे भाव वाढणार, भारतीय बँकांकडून मोठा निर्णय, थेट आयात..
Gold prices
| Updated on: Apr 17, 2026 | 1:40 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात अगोदरच सोने आणि चांदीचे भाव अस्थिर झाले. उच्चांकानुसार सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण आहे. आता सोने आणि चांदीबद्दल अत्यंत मोठी बातमी पुढे येत आहे. ज्यानंतर सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होऊ शकते. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, भारतीय बँकांनी परदेशातून सोने आणि चांदीच्या आयातीच्या ऑर्डर थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला. सीमा शुक्लामुळे ऑर्डर थांबवल्याची माहिती मिळत आहे. सरकारकडून सोने आणि चांदी आयातीबाबत कोणताही आदेश जारी करण्यात आला नाही. त्यानंतर बँकांनी परदेशातून सोने आयात थांबवण्याचा निर्णय घेतला. सरकारने अजूनही अधिसूचना जारी केली नाही. या घडामोडींमुळे देशात सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या घडीला देशात उच्चांकापेक्षा सोन्याचे भाव कमी आहेत. मात्र, अचानकपणे सोन्याचे भाव वधारू शकतात. या निर्णयाने भारतात सोन्याची कमी निर्माण होऊ शकते. भारतात सोने आणि चांदी विदेशातूनच आयात होते. भारताचा स्वत:चा असा कोणताच सोर्स नाही. सरकारने सोने आणि चांदीबाबत सीमा शुल्क आदेश शेवटी एप्रिल 2025 मध्ये काढला होता. जो 31 मार्च 2026 पर्यंतच वैध होता आता बँक सरकारच्या नव्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत.

जोपर्यंत सरकारकडून नवीन आदेश काढला जात नाही, तोपर्यंत बँक सोने खरेदी करणार नाहीत. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, सराफा व्यापाऱ्याने आशा होती की, सरकार डीजीएफटी दरवर्षीप्रमाणे एप्रिलच्या सुरुवातीला हा आदेश जारी करेल. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. जवळपास 5 टन सोने सीमा शुल्क परवानगी न मिळत असल्याने अडकून पडले आहे. यासोबतच 8 टन चांदीही अडकून पडली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे कल्याण ज्वेलर्स अशा मोठ्या कंपन्यांचे शेअरही पडली आहेत. अक्षय तृतीया तोंडावर आहे. यादिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. यादरम्यानच ही बातमी पुढे येत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात सोने आणि चांदीच्या भावात चांगलीच घसरण झाली. सोन्याचे भाव दोन लाखाच्या आसपास पोहोचला होता. आता 50 हजारांनी उच्चांकापेक्षा सोने स्वस्त झाले. यादरम्यानच ही वाईट बातमी सोने आणि चांदीबद्दल येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...