Gold rates : सोन्याच्या दरात मोठा भूकंप, थेट 38 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवे रेट

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरूच आहे. सोन्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. त्यातच आता सराफा बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Gold rates : सोन्याच्या दरात मोठा भूकंप, थेट 38 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवे रेट
सोन्याच्या दरात घसरण
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 26, 2026 | 4:00 PM

जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, किंवा दिवाळीपूर्वी सोनं खरेदी करायचं आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. सोन्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीमुळे एकीकडे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे, तर दुसरीकडे दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईमध्ये सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते असा दावा देखील या क्षेत्राती काही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्या तरी सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा जो आतापर्यंतचा सर्वोच्च दर होता, त्या दराच्या तुलनेत गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल प्रति तोळा 38,600 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे सोन्याच्या दरात सातत्याने घसरण का होत आहे? आणि दिवाळीच्या काळात तरी सोन्याच्या दरात वाढ होणार का?

सर्वसामान्यपणे सोन्याच्या दरावर अंतराष्ट्रीय बाजार, अमेरिकन डॉलरची मजबुती, व्याजदराबद्दल असलेल्या अपेक्षा, कच्च्या तेलाच्या किंमती, अशा विविध घटकांचा परिणाम होत असतो. या सर्व घटकांच्या किमतीमध्ये चढ-उतार झाला तर त्यानुसार सोन्याचे दर देखील कमी जास्त होत असतात. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. सोन्याच्या आतापर्यंतचा जो सर्वोच्च दर होता, त्याच्या तुलनेत गेल्या काही महिन्यात सोनं तब्बल 38 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.

Loading...

दिवाळीच्या काळात सोनं पुन्हा महाग होणार का?

एनरीच मनीचे सीइओ पोनमुडी आर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार MCX वर 1,40,000 प्रति तोळ्याचा सोन्याचा दर हा एक बेस सपोर्ट दर आहे, जर समजा सोन्याचे दर 1,40,000 प्रति तोळ्याच्या वर पोहोचले तर सोन्याच्या दरात मोठी रिकव्हरी होऊ शकते, सोन्याचे दर 1,48,000 ते 1,52,000 रुपयांपर्यंत देखील पोहूच शकतात, परंतु जर हे सोन्याचे दर जर 1,40,000 रुपयांपेक्षा कमी झाले तर ते 1,36,000 ते 1,38,000 रुपये प्रति तोळ्याच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

काय आहेत नवे दर? 

जळगाव सराफा  बाजारानुसार सध्या 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा जीएसटीसह 1 लाख 46 हजार 260  रुपये एवढे आहेत. तर दुसरीकडे चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 4 हजार 970 रुपये एवढे आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us