AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक मोठ्याने वाजू लागला फोन, सरकारने पाठवला महत्त्वाचा मेसेज, तुम्हाला आला काय?

अचानक वेगाने मोबाईल वाजू लागल्याने देशातील अनेक भागातील नागरिक आज घाबरले. सरकारने पुन्हा आज आपल्या 'आपत्कालिन अलर्ट' प्रणालीची चाचणी केली.

अचानक मोठ्याने वाजू लागला फोन, सरकारने पाठवला महत्त्वाचा मेसेज, तुम्हाला आला काय?
Emergency alert on phone
| Updated on: May 30, 2026 | 7:45 PM
Share

जर तुमच्या मोबाईलवर जोरात विचित्र आवाजाची रिंग वाजली असेल आणि एखादा अनपेक्षित संदेश स्क्रीनवर दिसत असेल तर घाबरु नका. केंद्र सरकारने आज पुन्हा ‘आपत्कालिन अलर्ट’ प्रणालीची चाचणी केली. ही चाचणी देखील सर्वसामान्य मोबाईल वापरकर्त्यांना आज अनुभवता आली. मागे २ मे रोजी सरकारने दूर संचार विभाग ( dot ) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ( एनडीएमए ) यांच्या संयुक्त प्रणालीद्वारे सेल ब्रॉडकास्ट राबविण्यात आले. अनेक देशात ही प्रणाली राबवण्यात येते.

दिल्ली-एनसीआर सर्व उत्तर भारतील बहुतांशी भागात शनिवारी सायंकाळ साडे पाच वाजता स्मार्टफोन अचानक जोराने वाजू लागले. अनेकजणांना त्यामुळे भीती वाटली. या वेळी मोबाईलवर वाजणारा संदेश लोकांनी घाबरत घाबरतच पाहिला. तर हा संदेश सरकारने हवामाना संदर्भात दिला होता.

मोबाईलवर वेगवान आवाज येऊ लागल्याने आज दिल्लीतील लोक घाबरले. त्यांच्या मोबाईलवर एक जोरदार साऊंड आला. हा SOS साऊंड आला. याची प्रणालीची टेस्टींग २ मे रोजी करण्यात आली होती. त्यावेळी पहिल्यांदा अशी चाचणी झाल्याने अनेक लोक प्रचंड घाबरले. याचे नाव सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम आहे.

फोनवर अचानक हवामानाचा अलर्ट का ?

या संदेशात स्पष्टपणे लिहिले होते की येत्या ३ तासात जनपद येथील काही स्थानांवर विजांसह जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच पावसाच्या जोरदार सरींसह गारांचा वर्षाव होण्याची शक्यता या संदेशात वर्तवण्यात आली होती.

संकट किती गंभीर ?

स्मार्टफोनमध्ये पाठवलेल्या संदेशात असे स्पष्ट म्हटले आहे की ताशी ९० किमीच्या वेगाने वारा वाहू शकतो. तसेच वीजा चमकू शकतात आणि गारपीठीची देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे लोकांना कोणत्याही सुरक्षित स्थानी आसरा घ्यावा असे या संदेशात म्हटले होते.

भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ( एनडीएमए ) मदतीने देशभरात मोबाईल बेस्ड आपत्कालिन संचार प्रणालीला मजबूत केले आहे. सरकार या संदेशाच्या मदतीने भारतीय नागरिकांना तातडीने आपात्कालिन स्थितीत माहिती दिले जाते.

इस्रायलने देखील त्यांच्या नागरिकांना आवश्यक आणि इमर्जन्सी अलर्ट पाठवण्यासाठी या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. इस्रायल देशात मिसाईल, ड्रोन वा रॉकेटचा अलर्ट देण्यासाठी नागरिकांना या टेक्नॉलॉजीद्वारे अलर्ट पाठवले जातात. ज्यानंतर नागरिक सुरक्षित स्थानी वा बंकरमध्ये लपतात.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?