Smit Machachchar : 174 प्रवाशांचे जीव वाचवणारा भारताचा हिरो स्मिथ माछरला गुजरात सरकारकडून प्रचंड मोठ्या इनामी रक्कमेचा पुरस्कार जाहीर
Smit Machachchar : कॅप्टन स्मित माछरने फ्लाय दुबईच्या FZ1073 विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन पायलटांमध्ये झालेल्या झटापटीदरम्यान माछर यांनी शौर्य दाखवून परिस्थिती हाताळली त्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव बचावले. त्यांना आता गुजरात सरकारने मोठा पुरस्कार जाहीर केला आहे.

स्मिथने प्रचंड शौर्य दाखवलंय, त्याला लाईफ टाईम अचिवमेंटचा पुरस्कार मिळायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं कौतूक केलं ही बाब माझ्यासाठी खुप मोठी, स्मिथ हा घाटकोपरचाच राहणारा आहे, माझ्याच मतदार संघात राहतो. त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे, मी याला माझं भाग्य मानतो. गुजरात सरकारने त्याला २५ लाखाचा पुरस्कार जाहीर केलाय त्यासाठी त्याचं कौतूक. राज्य सरकारनेही त्याला पुरस्कार द्यावा, यासाठी मी स्वता प्रयत्न करणार आहे. जे लोक म्हणतात की स्मितला काऊंट दहशतवादचं ट्रेनिंग कसं मिळालं? त्यांना एवढच सांगायचं आहे की, त्याने ऐवढ्या लोकांचा जीव कसा वाचवला. मला त्यांच्या बुद्धीची किव येतेय, असं भाजप आमदार पराग शाह यांनी टीव्ही9मराठीशी बोलताना सांगितलं आहे.
त्याने प्रसंगावधान दाखवून १७४ प्रवाश्यांचे प्राण वाचवले , तो स्वताही त्यात गंभीर जखमी झाला. सगळे स्मिथचं कौतूक तरत आहेत. पण जर कुणी यात राजकारण करत असेल तर त्यांची कीव येते. तो भारतात परतायला अजून वेळ आहे, त्यामुळे आम्ही त्याचं स्वागतासाठी ऊत्सूक आहोत.
दरम्यान, दुबईस्थित भारताचे पायलट कॅप्टन यांनी शोर्याचा अतिशय दर्जेदार खेळ दाखवला आहे. त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून तब्बल १७० जणांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे अवघ्या जगामधून त्यांचे कौतुक होत आहे. स्मिथ हे मुळचे मुंबईतील असून ते घाटकोपरमध्ये राहतात. त्यामुळे येथील आमदार भाजपचे नेते पराग शाह यांनीही प्रचंड कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी गुजरात सरकारने त्यांना तब्बल २५ लाख रुपयांचे बक्षिस दिले असल्याचीही माहिती दिली आहे. त्याशिवाय आता त्यांना राज्य सरकारकडूनही म्हणजे महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला पाहिजे अशीही भूमिका त्यांना जाहीर केली आहे. त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नेमकी काय घडली होती घटना?
दरम्यान, आपल्या सह-वैमानिकासोबत दुबईहून तेल अवीवला विमान उडवत असताना, सह-वैमानिकाने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यामध्ये ते जखमी झाले परंतू तरीही त्याने विमानावरील कंट्रोल सुटू दिला नाही. कॅप्टन स्मित माछरवर हल्ला झाला तेव्हा बोईंग ७३७ मॅक्स विमान कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. ३०,००० फूट प्रति मिनिट या वेगाने विमान खाली सरकत होते. डेटानुसार, विमान केवळ २९ सेकंदात ३०,८७५ फुटांवरून १६,७५० फुटांपर्यंत खाली आले. यावेळी कॅप्टन स्मित माछर यांनी सुमारे १४,००० फूट उंचीवर विमानाचा ताबा मिळवण्यात यश मिळविले.
