शाळेचे छत कोसळून मोठी दुर्घटना, 25 विद्यार्थी जखमी, तीन गंभीर

हरियाणाच्या सोनीपतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सोनीपतमध्ये शाळेचे छत कोसळले आहे. छप्पर कोसळल्याने जवळपास 25 विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे.

शाळेचे छत कोसळून मोठी दुर्घटना, 25 विद्यार्थी जखमी, तीन गंभीर
Haryana school roof collapse
| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 3:38 PM

चंदीगड : हरियाणाच्या सोनीपतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सोनीपतमध्ये शाळेचे छत कोसळले आहे. छप्पर कोसळल्याने जवळपास 25 विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे.

सोनीपत येथील गन्नौर इथे हा अपघात झाला. या गावातील ही शाळा होती. अचानकपणे छत कोसळल्यामुळे दुर्घटना झाली. यामध्ये दोन डझनपेक्षा जास्त विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय तीन कर्मचाऱ्यांचाही जखमींमध्ये समावेश आहे.

जखमी विद्यार्थ्यांना गणौर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 5 विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत. शाळेचं छत कसे कोसळलं? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

जीवानंद शाळेच्या तिसऱ्या इयत्तेच्या वर्गाचं छत दुरुस्त केलं जात होतं. छतावर माती टाकली जात होती. त्यावेळी अचानक छत भराभर खाली कोसळलं.

संबंधित बातम्या  

राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेते फडवीसांच्या भेटीला, राष्ट्रवादी-शिवसेना नाराज, फडणवीसांनीही कोंडीत पकडलं!