AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Marriage : लव्ह मॅरेज बॅन, या गावात प्रेम केल्यास अजब शिक्षा, पंचायतीचा गजब निर्णय!

या निर्णयाची देशभरात चर्चा झाल्यानंतर संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीने आमचा आणि या निर्णयाचा काहीही संबंध नाही, अशी भूमिका घेतली आहे. सामाजिक स्तरावर हा निर्णय घेण्यात आलाय, असं ग्रामपंचायतीने स्पष्ट केलंय.

Love Marriage : लव्ह मॅरेज बॅन, या गावात प्रेम केल्यास अजब शिक्षा, पंचायतीचा गजब निर्णय!
love marriage ban decisionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 9:59 PM
Share

Love Marriage Ban : प्रेमाला जात, धर्म, पंथ नसतो. प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही. परंतु आपला समाज परधर्मात केलेलं प्रेम, वेगळ्या जातीत झालेला विवाह स्वीकारत नाही. परधर्मीयाशी प्रेम केलं म्हणून आपल्या देशात अनेक तरुण-तरुणींच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी तर प्रेमी युगुलाच्या कुटुंबालाच वाळीत टाकलं जातं. दरम्यान आता एका गावात अवाक करणारा निर्णय घेण्यात आलाय. प्रेम केल्यास प्रेमी युगुलाला तसेच त्यांच्या कुटुंबीयांना अजब शिक्षा भोगावी लागणार आहे.

नेमका निर्णय काय झाला?

मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेली ही घटना हरियाणा राज्यातील एका गावातील आहे. या गावातील सामाजिक पंचायतीने एक अजब आणि तुघलकी निर्णय घेतलाय. त्यांनी थेट लव्ह मॅरेजच्या विरोधात एक फर्मान सोडले आहे. प्रेमविवाह करणारे प्रेमी युगुल तसेच त्यांच्या कुटुंबीयांना थेट बहिष्कृत केलं जाईल, असा हा निर्णय आहे. या निर्णयाची आता सगळीकडे चर्चा होत आहे.

निर्णय नेमका का घेतला?

हरियाणातील गावात झालेल्या या सामाजिक पंचायतीत साधारण 1000 लोकांचा समावेश होता. या गावात गेल्या काही महिन्यात एकूण तीन प्रेमविवाह झाले. या विवाहानंतर पंचायत बोलवण्यात आली. या पंचायतीच्या अध्यक्षस्थानी कुलवंत गोसला होते. आम्ही गावातील सर्व तरुणींना आमच्या मुली समजतो. त्यामुळे एकाच गावात राहणारे प्रेमी युगुल एकमेकांशी लग्न करू शकत नाहीत, असा निर्णय या पंचायतीत घेण्यात आला. अशा प्रकारचा विवाह हा प्रथा, परंपरांच्या विरोधात आहे, असे एकमत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे एकाच गावातील प्रेमी युगुलांचा प्रेमविवाह होतोय का? यावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीने काय स्पष्टीकरण दिलं?

दरम्यान, या निर्णयाची देशभरात चर्चा झाल्यानंतर संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीने आमचा आणि या निर्णयाचा काहीही संबंध नाही, अशी भूमिका घेतली आहे. सामाजिक स्तरावर हा निर्णय घेण्यात आलाय, असं ग्रामपंचायतीने स्पष्ट केलंय. त्यामुळे आता या निर्णयाचे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?