भाषण लांबवणाऱ्या खासदाराला सोडून हेलिकॉप्टरचं टेकऑफ

लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते वेगवान सभा घेत या शहरातून त्या शहरात जातात. पण काही नेत्यांना बोलण्याचा मोह आवरता येत नाही आणि पुढील सर्व कार्यक्रम लांबणीवर पडतात. उत्तर प्रदेशातील भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे चिरंजीव राजवीर सिंह यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. एटाचे विद्यमान खासदार राजवीर सिंह उत्तर प्रदेशातील कौशांबी …

भाषण लांबवणाऱ्या खासदाराला सोडून हेलिकॉप्टरचं टेकऑफ

लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते वेगवान सभा घेत या शहरातून त्या शहरात जातात. पण काही नेत्यांना बोलण्याचा मोह आवरता येत नाही आणि पुढील सर्व कार्यक्रम लांबणीवर पडतात. उत्तर प्रदेशातील भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे चिरंजीव राजवीर सिंह यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला.

एटाचे विद्यमान खासदार राजवीर सिंह उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात कोसम ईनाम गावात भाषण करत होते. इथे भाजपकडून विनोद सोनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजवीर हे प्रचारासाठी हेलिकॉप्टरने आले होते. पण सभा लांबली आणि हेलिकॉप्टरच्या पुढील उड्डाणाची वेळ झाली.

मोदी सरकारच्या योजनांचं कौतुक करण्यात राजवीर सिंह एवढे व्यस्त झाले, की त्यांना हेलिकॉप्टरच्या वेळेचंही भान राहिलं नाही. राजवीर यांना टेकऑफची सूचनाही देण्यात आली होती. पण अजून 10 मिनिट थांबा असं म्हणत त्यांनी भाषण लांबवलं.

राजवीर सिंह यांचं भाषण लांबत असताना पायलटला पुढील ठिकाणी पोहोचण्यासाठी उशिर होत होता. त्यामुळे पायलटने खासदार महोदयांना व्यासपीठावरच सोडलं आणि टेकऑफ केलं. हेलिकॉप्टरचं उड्डाण हे ठरलेल्या वेळेवरच केलं जातं. पण राजवीर सिंह यांना याचा विसर पडला असावा, ज्यामुळे त्याना नंतर कारने लखनौला जावं लागलं. यामुळे ते नाराजही दिसून आले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *