AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story: पदवीच्या अंतिम वर्षालाच UPSC ची तयारी, पहिल्यातच प्रयत्नात उत्तीर्ण, झाली IFS

UPSC Success Story: युपीएससीची परीक्षेला देशभरातून हजारो विद्यार्थी बसत असतात. परंतू फारच कमी लोक या परीक्षेत यश मिळवू शकतात. ही परीक्षा देशातील सर्वात अवघड आणि आत्मसंतुलनाची परीक्षा पाहणारी परीक्षा असते. यात मुस्कान हीने 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Success Story: पदवीच्या अंतिम वर्षालाच UPSC ची तयारी, पहिल्यातच प्रयत्नात उत्तीर्ण, झाली IFS
ifs muskan Jindal
| Updated on: Apr 05, 2026 | 6:12 PM
Share

युपीएससीच्या परीक्षेत बसून यश मिळवणे सोपे नाही. मोठ्या पदाची सरकारी नोकरी आणि अन्य सुविधांसाठी हजारो तरुण दरवर्षी या सर्वात अवघड परीक्षेस बसत असतात. मोजक्या लोकांना या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. अनेक जण बरेच प्रयत्न करुनही यश मिळवू शकत नाहीत. हिमाचल प्रदेशातील मुस्कान जिंदल हीने केवल २२ व्या वर्षात पहिल्या प्रयत्नात युपीएससीची सिव्हील सेवा परीक्षा पास केली आहे. तिची आयएएस बनण्याची इच्छा होती. परंतू तिने आयएएस ऐवजी भारतीय विदेश सेवा म्हणजेच आयएफएस (IFS)निवड केली आहे.

मुस्कान लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. तिने सुरुवातीलाच सिव्हील सेवेत जायचे असे ठरवले होते. १२ वी मध्ये तिला ९६ टक्के मिळाले होते. त्यानंतर ती अभ्यासासाठी चंदीगड येथे गेली. जेथे तिने एस.डी.कॉलेजमधून बीकॉम (ऑनर्स) केले. कॉलेजातही तिने तिची बुद्धीमत्ता दाखवली आणि ग्रॅज्युएशनमध्ये टॉप आली.

ऑल इंडिया 87 वी रँक मिळवली

मुस्कान हीने पदवीच्या अंतिम वर्षाला असतानाच युपीएससीची तयारी सुरु केली होती. रोज ४ ते ५ तास अभ्यास करुन ती तिच्या ध्येय्याकडे चालली होती. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर वय कमी असल्याने लगेच तिला परीक्षेस बसता आले नाही.परंतू यावेळेचा उपयोग करुन अभ्यास सुरुच ठेवला. साल २०१९ मध्ये मुस्कानने पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिसी आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. तिला ऑल इंडिया 87 रँक मिळाली. त्यानंतर तिने भारतीय विदेश सेवा (IFS) क्षेत्र निवडले.

मोबाईल आणि इंटरनेटचा योग्य वापर

आयएफएस मुस्कान जिंदल हीने तिच्या यशाला स्वयंशिस्त आणि सेल्फ कंट्रोल जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तिने मोबाईल आणि इंटरनेटचा योग्य वापर करुन अभ्यासातून लक्ष भटकू दिले नाही. अभ्यास आणि मानसिक संतुलनाचा चांगला ताळमेळ राखला. आपल्या यशा कुटुंबियांची साथ जबाबदार असल्याचे ती म्हणते. आई-वडीलांनी नेहमी आत्मविश्वास वाढवला, प्रत्येक पावलांवर तिला साथ दिली आहे. आज मुस्कान केवळ आयएफएस अधिकारीच नाही तर तरुणांचे प्रेरणा स्थान आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?