AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Elections 2022: निवडणुकीच्या रणनीतीवर उद्या अमित शाह घेणार वाराणसीत बैठक, भाजपचे सर्व 403 विधानसभा प्रभारी राहणार उपस्थित

अमित शाह निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, संघटनेचे सरचिटणीस सुनील यांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत.

UP Elections 2022: निवडणुकीच्या रणनीतीवर उद्या अमित शाह घेणार वाराणसीत बैठक, भाजपचे सर्व 403 विधानसभा प्रभारी राहणार उपस्थित
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 24, 2021 | 2:56 PM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या, 12 नोव्हेंबरला आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाराणसीत भेट देणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा विजयी होण्यासाठी निवडणुकीच्या रणनीतीवर बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या TFC मध्ये, भारतीय जनता पक्षाने सर्व 403 विधानसभा प्रभारी, 98 संघटनात्मक जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या जिल्हा प्रभारी यांना बैठकीसाठी बोलवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे निवडणूक प्रभारी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान या बैठकीला संबोधित करतील.   (Home Minister Amit Shah visit to Varanasi on November 12 to prepare the strategy for UP assembly election 2022 CM Yogi Adityanath will also be present)

बैठकीला कोण उपस्थित असतील

या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि प्रदेश संघटन सरचिटणीस सुनील बन्सल आणि सर्व प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश प्रभारीही उपस्थित राहणार आहेत. वाराणसीच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमित शाह गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आयोजित परिषदेचे उद्घाटनही करतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेशचंद श्रीवास्तव यांनी सांगितले की, 12 नोव्हेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय हस्तकला संकुल, वाराणसी येथे भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या सर्व 403 विधानसभा प्रभारी, 98 संघटनात्मक जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा प्रभारी यांची बैठक आहे.

विविध क्षेत्रांचा अहवाल तयार करणार आला आहे

ही बैठक दोन सत्रात होणार आहे. राज्य निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान पहिल्या सत्राला संबोधित करतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्या सत्राला संबोधित करतील, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार आहेत.

निवडणूक व्यवस्थापन टीमकडून विविध क्षेत्रांचा अहवाल तयार करणार आला आहे. त्याआधारे अमित शहा आगामी निवडणुकीची रणनीतीवर चर्चा करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक व्यवस्थापन टीमच्या बैठकीनंतर अमित शाह निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, संघटनेचे सरचिटणीस सुनील यांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत. यासोबतच अमेठी कोठीतही महत्त्वाची बैठक होणार आहे.

Other News

Punjab Elections: विधानसभेत गदारोळ, अमरिंदर सिंग यांची पंजाब सरकारविरोधात भूमीका

Goa Elections 2022: टेनिस स्टार लिएंडर पेसने गोव्यात केली जनसंपर्क मोहिमेला सुरुवात

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती