Goa Elections 2022: टेनिस स्टार लिएंडर पेसने गोव्यात केली जनसंपर्क मोहिमेला सुरुवात

तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतर टेनिसपटू लिएंडरने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तृणमूलने गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. गोव्यात प्रादेशिक पक्षांसोबत निवडणूकीत युती करणार असल्याचे ममता यांनी गोवा दौऱ्यात स्पष्ट केले होते.

Goa Elections 2022: टेनिस स्टार लिएंडर पेसने गोव्यात केली जनसंपर्क मोहिमेला सुरुवात
Leander Paes

माजी टेनिस स्टार लिएंडर पेसन पुढील वर्षी गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीदरम्यान नुकतेच त्याने तृणमूल कोंग्रेसमध्ये प्रवेश केला. लिएंडर पेसने गुरुवारपासून त्याच्या जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली. (Tennis star Leander Paes starts campaign in Goa for 2022 elections for Trinamool Congress)

तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतर टेनिसपटू लिएंडरने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तृणमूलने गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. गोव्यात प्रादेशिक पक्षांसोबत निवडणूकीत युती करणार असल्याचे ममता यांनी गोवा दौऱ्यात स्पष्ट केले होते. लिएंडर पेस गोव्यात तृणमूलचा मुख्य चेहरा असेल, असे मानले जात आहे. पुढील वर्षी गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

गुरुवारी लिएंडर पेसने ट्विट केले, “माझ्या मोहिमेची सुरुवात स्वातंत्र्यसेनानी ज्युलियाओ मिनेझिस यांच्या एम्बेलिम ​​येथील घरी आदरांजली देऊन, कोळीवाड्डो डॉकयार्ड येथील मच्छिमारांशी संवाद साधून झाला”.

तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतर, 48 वर्षीय माजी टेनिसस्टार म्हणाला हेती की, “माझे ममता बॅनर्जीसोबतचे नाते अनेक वर्षे जुने आहे. ममता दीदी काही बोल्या की ते करतात. त्या खऱ्या चॅम्पियन आहे. गोव्यातील जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मी तुमच्या बहिणीसारखी आहे, मी येथे सत्ता बळकावण्यासाठी आलेली नाही. संकटाच्या वेळी लोकांना मदत केली तर माझ्या मनाला शांती मिळते. आम्ही तुम्हाला त्यात मदत करू. मला भविष्यात गोव्याला एक मजबूत राज्य बनवायचे आहे. मला गोव्यात नवी पहाट पहायची आहे.”

Other News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उद्या शस्त्रक्रिया, मान आणि मणक्याच्या आजारावर उपचार सुरु

Punjab Elections: विधानसभेत गदारोळ, अमरिंदर सिंग यांची पंजाब सरकारविरोधात भूमीका


Published On - 7:37 pm, Thu, 11 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI