AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर इराणचा मित्र मैदानात, अमेरिकेला थरकाप उडवणारी धमकी, युद्ध पुन्हा सुरू होणार? जगभरात खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, युद्ध पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली, त्यानंतर आता यामध्ये इराणच्या मित्राची एन्ट्री झाली आहे. अमेरिकेला मोठा इशारा देण्यात आला आहे.

मोठी बातमी! अखेर इराणचा मित्र मैदानात, अमेरिकेला थरकाप उडवणारी धमकी, युद्ध पुन्हा सुरू होणार? जगभरात खळबळ
trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 19, 2026 | 8:02 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. मात्र तणाव अजूनही कायम आहे, इराणकडून पुन्हा एकदा स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद करण्यात आल्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढला आहे. अमेरिका आणि ईराणमध्ये युद्धविरामाच्या वाटाघाटीची दुसरी फेरी लवकरच होण्याची शक्यता आहे, मात्र हे सर्व सुरू असतानाच पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हादरवणारी धमकी दिली आहे. आता इराणला संपवण्याची वेळ आली आहे, आम्ही आता इराणचं काहीही ऐकून घेणार नाही, जर इराणने आमच्यासोबत सामंजस्य करार केला तर ठीक नाही तर आम्ही कडक कारवाई करू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र ट्रम्प यांच्या या धमकीनंतर आता तणाव आणखी वाढला आहे.

अमेरिका इराण युद्धामध्ये पुन्हा एकदा हुती बंडखोरांची एन्ट्री झाली आहे. यमनच्या हुती बंडखोरांकडून पुन्हा एकदा बाब- अल-मंडेबची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम राष्ट्रांवरील आक्रमण थांबवावं, अन्यथा जर आम्ही बाब-अल मंडेबची सामुद्रधुनी बंद केली तर जगातील कोणतीही माहाशक्ती पुन्हा या सामुद्रधुनीला ओपन करू शकणार नाही असा इशारा हुती प्रशासनाचे उप परराष्ट्रमंत्री हुसेन अल-एजी यांनी दिला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे, मात्र पुन्हा एकदा इराणकडून होर्मूजची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा करण्यात आली, त्यानंतर आता थेट हुती बंडखोरांकडून धमकी देण्यात आली आहे. दरम्यान आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद आहे, त्यात आता जर पुन्हा बाब -अल मंडेबची सामुद्रधुनी बंद झाली तर जागावर मोठं संकट निर्माण होऊ शकतो. जगातील हा एक सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. हा मार्ग बंद झाल्यास युरोपीयन राष्ट्र मोठ्या संकटात सापडू शकतात.

हुसैन अल-एजी यांनी शनिवारी आपल्या ट्विटरवर या संदर्भातील पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जर सनाने (यमनची राजधानी) बाब -अल मंडेबची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला तर जगातील कोणतीच महाशक्ती पुन्हा हा रस्ता सुरू करू शकणार नाही. त्यामुळे अमेरिका आणि त्यांच्या सहकार्यासाठीच हेच योग्य राहील की त्यांनी आपली पाऊल वेळीच रोखावीत, त्यांनी मुस्लिम राष्ट्राच्या मतांचा, आदर करावा. जगात शांतता ठेवावी असा इशारा हुती बंडखोरांकडून डोनाल्ड  ट्रम्प यांना देण्यात आला आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?