AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक किलो मिठामध्ये किती दाणे असतात? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल चकित

एक किलो मिठामध्ये जास्तीत जास्त किती दाणे असू शकतात? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे, एक किलो मिठात किती दाणे असतात? याचं उत्तर चार मित्रांनी शोधून काढलं आहे.

एक किलो मिठामध्ये किती दाणे असतात? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल चकित
saltImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 15, 2026 | 2:56 PM
Share

तुम्ही कधी विचार केला आहे का? एक किलो मिठामध्ये जास्तीत जास्त किती दाणे असू शकतात? अनेकांना हा प्रश्न पडला असेल, काही लोकांनी याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न देखील केला असेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चार मित्रांनी मिळून हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे की, एक किलो मिठामध्ये किती दाणे असू शकतात? त्यासाठी या चार मित्रांनी मिठाचं एक किलोचं पॉकेट विकत घेतलं. त्यानंतर त्यांनी या पॉकेटमधलं मीठ काळजीपूर्वक एक टेबलवर पसरवलं आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की एका किलो मिठामध्ये नेमके किती दाणे असतात. त्यानंतर या चारही मित्रांनी एक -एक दाणे मोजण्यास सुरुवात केली. त्यांना एक किलो मिठाचे दाणे मोजण्यासाठी तब्बल 9 दिवस लागले. 9 व्या दिवशी अखेर आकडा समोर आला.

या चार मित्रांनी केलेल्या दाव्यानुसार 100 ग्रॅम मिठामध्ये जवळपास 13 लाख 75 हजार दाणे आहेत. याचा हिशोबाने एक किलो मिठामध्ये 1 कोटी 37 लाख 50 हजार दाणे असायला पाहिजेत, मात्र या मित्रांनी केलेल्या दाव्यानुसार एक किलो मिठामध्ये 1 कोटी 42 लाख 13 हजार 753 दाणे आहेत. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हा एक अंदाज आहे. वैज्ञानिकांच्या मते मिठाच्या प्रत्येक दाण्याचा आकार हा वेगवेगळा असतो, त्यामुळे एक किलो मिठातील दाण्यांची संख्या देखील कमी -जास्त होऊ शकते. जर सरासरी काढायची झाली तर एक किलो मिठामध्ये जास्तीत जास्त 1 ते 2 कोटी दाणे असू शकतात.

यापूर्वी देखील काही जणांनी एक किलो मिठामध्ये किती दाणे असू शकतात, हे मोजण्याचा प्रयत्न केला आहे. ही संख्या 8 कोटीपर्यंत पोहोचली आहे. एक किलो मीठामध्ये किती दाणे असू शकतात? हे त्या मिठाचे दाणे किती मोठे किंवा बारीक आहेत? यावर एक किलो मिठामध्ये किती दाणे असू शकतात हे अवलंबून असतं. आणखी एका अंदाजानुसार जर मिठाचा एक दाना 0.1 मिलीमीटर मानला तर एक किलो मिठाच्या दाण्यांची संख्या तब्बल 83 कोटी एवढी देखील असू शकते. काही मिठाचे दाणे हे बारीक असतात तर काही मिठाचे दाणे हे मोठे असतात, त्यामुळे त्यांच्या आकारानुसार ही दाण्यांची संख्य कमी जास्त होऊ शकते.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या