AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: इराणमध्ये एक किलो आटा किती रुपयांना मिळतो? किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही

इराणमध्ये आधीच महागाई गगनाला भिडली आहे, त्यातच आता युद्धाने देखील आणखी भर घातली आहे. इराणमध्ये एक किलो आट्याची किंमत किती असू शकते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यावर तुमचा विश्वासही बसणार नाही.

GK: इराणमध्ये एक किलो आटा किती रुपयांना मिळतो? किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही
इराणमध्ये एक किलो आटा किती रुपयांना मिळतो?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 08, 2026 | 7:22 PM
Share

अमेरिका इराण आणि इस्त्रायलमध्ये 40 दिवस युद्ध सुरू होतं. आज अखेर युद्धविरामाची घोषणा झाली आहे. या युद्धामुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. इराणमध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. इराणमध्ये महागाई वाढण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत, त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे पाश्चिमात्य देशांनी विशेष: अमेरिकेनं इराणवर अनेक निर्बंध घातले आहेत. अमेरिकेकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे इराणमधून निर्यात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या निर्यातीमध्ये मोठी घट झाली आहे. त्याचा मोठा फटका हा इराणच्या अर्थव्यवस्थेला बसला असून, इराणमध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यामुळे इराणची परिस्थिती गंभीर बनली आहे. महागाईच्या मुद्द्यावर इराणमध्ये अनेकदा आंदोलनं देखील झाली आहेत. त्यातच आता या महागाईत युद्धाने आणखी भर घातली आहे.

इरामध्ये एक किलो आट्याची किंमत साधारणपणे 72,000, 1,93,000 इराणी रियाल एवढी आहे. यावरूनच तुम्हाला इराणमधील महागाईचा अंदाज येऊ शकतो. इराणच्या मोठ्या शहरांमध्ये तर एक किलो आट्याची किंमत याहीपेक्षा जास्त आहे. भारतीय रुपयांमध्ये आट्याची किंमत सांगायची झाल्यास भारताच्या एक रुपयाचं मूल्य इराणच्या 14,000 इराणी रियाल इतकं आहे. याचाच अर्थ इराणमध्ये एक किलो आटा 5 ते 14 भारतीय रुपयांमध्ये मिळू शकतो. मात्र भारतीय रुपयांमध्ये जरी ही किंमत खूप कमी वाटत असली तरी देखील स्थानिक लोकांसाठी ही किंमत खूप जास्त आहे.

इराणी रियालची किंमत ही सातत्याने घसरत आहे. यामुळेच इराणमध्ये महागाई गगनाला भिडली आहे. इराणमध्ये आट्याची किंमत खूप जास्त आहे. मात्र किंमत जास्त असून देखील तो पुरशा प्रमाणात उपलब्ध देखील होत नाहीये. आटा मिळवण्यासाठी तेथील लोकांना तासंतास रांगेत उभं राहावं लागत आहे. एवढंच नाही तर इराणमध्ये एक किलो चिकनची किंमत तब्बल 25 लाख ते 35 लाख रियाल एवढी आहे. तर मटणाची किंमत 2.7 लाख ते 7 रियाल एवढी आहे. इराणमध्ये एक लिटर दूधाची किंमत 5.7 लाख ते 8.2 इराणी रियाल एवढी आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा