AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युपीएस की एनपीएस, पर्याय निवडायचाय ? ऑनलाईन सिस्टीम खराब आहे, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यासाठी सरकारने दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्यांना युपीएसचा ( UPS ) पर्याय निवडायचा आहे. आणि ऑनलाईन सिस्टीम ठप्प आहे. तर कर्मचाऱ्यांना सरकारने दुसरा पर्याय दिला आहे.

युपीएस की एनपीएस, पर्याय निवडायचाय ? ऑनलाईन सिस्टीम खराब आहे, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा
pension news
| Updated on: Sep 19, 2025 | 8:03 PM
Share

यूनिफाईड पेन्शन स्कीम ( यूपीएस ) मध्ये सामील होण्याची ज्यांची इच्छा आहे. त्या कर्मचाऱ्यांच्यासाठी केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. अनेकांना युपीएसचा ऑनलाईन पर्याय निवडण्यात तांत्रिक अडचणी येत आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. अनेक ठिकाणी सर्व्हर खराब असल्याने तर काही ठिकाणी संगणकीय सिस्टीम हळू चालत असल्याने कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.

यूनिफाईड पेन्शन स्कीम (यूपीएस) मध्ये सामील होण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर असून ती जवळ आली आहे. त्यामुळे ही संधी हातातून निसटू नये यासाठी पेन्शन फंड रेगुलेटरी एण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (पीएफआरडीए) नवीन व्यवस्था केली आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आता युपीएस संदर्भात ऑफलाईन अर्ज देखील देऊ शकतात. म्हणजे फिजीकली ते फॉर्म जमा करु शकतात. कर्मचाऱ्यांना त्यांचा अर्ज आता संबंधित नोडल ऑफीसमध्ये जमा करता येणार आहे.

पेन्शन फंड रेग्युलेटरी एण्ड डेव्हलपमेंट अथोरीटी ‘पीएफआरडीए’ने १६ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आपल्या परिपत्रकात म्हटले होते की ऑफलाईन अर्ज करणारे कर्मचारी https:// www.npscra.nsdl.co.in/ups.php वरुन फॉर्म डाऊनलोड करु शकतात. या प्रक्रियेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत नोडल ऑफीसला जेवढे अर्ज मिळतील त्यांना निर्धारित प्रक्रियेनुसार स्वीकार केले जाणार होते. ३० सप्टेंबरनंतर एनपीएसमध्ये राहाणाऱ्या कर्मचाऱ्यांना युपीएसमध्ये सामील होता येणार नाही. ज्यांनी निर्धारित वेळेच्या मर्यादेत म्हणजेच ३०.०९.२०२५ पर्यंत यूपीएसचा पर्याय निवडला होता त्यांच्यासाठी यूपीएस ते एनपीएसमध्ये एक-वेळ स्विच पर्यायाची तरतूद देखील करण्यात आली आहे.

युपीएस ग्राहकांकडे हे पर्याय असतील

(i) युपीएसच्या अंतर्गत पात्र कर्मचारी केवळ एकदा एनपीएसमध्ये स्विच करु शकतात. परंतू पुन्हा युपीएसमध्ये स्विच करु शकत नाहीत.

(ii) स्विचचा प्रयोग सेवानिवृत्तीच्या किमान एक वर्षे आधी वा व्हीआरएसच्या तीन महिने आधी केला जाऊ शकतो.

(iii) शिक्षा म्हणून हटवले जाणे, बडतर्फ होणे वा अनिवार्य सेवानिवृत्तीची प्रकरणे किंवा अशी प्रकरणे ज्याच्यात अनुशासनात्मक कार्यवाही चालू आहे किंवा विचाराधीन आहे, त्यांना स्विच सुविधाची परवानगी दिली जाणार नाही.

(iv) जे लोक निर्धारित वेळेच्या आत स्विच का पर्याय निवडणार नाहीत, ते युपीएसच्या आत राहतील.

(v) एनपीएस निवडल्यानंतर नोकरदाराला एनपीएसचा लाभ मिळेल तसेच डिफॉल्ट गुंतवणूक पद्धतीवर सरकारचे वेगळे योगदान (४%) वजा केले जाईल आणि पैसे काढताना व्यक्तीच्या एनपीएस निधीमध्ये जमा केले जाईल.

(vi) हा स्विच विकल्प उपभोक्त्यांना यूपीएस निवडण्यास अधिक सुविधा प्रदान करेल तसेच सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा योजना तयार करण्यात त्यांची मदत करेल.

२५ ऑगस्टला एक अन्य कार्यालय जाहिरात जाहीर केली जाईल. त्यात युपीएसमधून एनपीएसमध्ये परतण्याची सुविधा दिली जाईल. यासाठी काही अटी देखील ठेवल्या आहेत. उदा. कर्मचारी केवळ एकदाच युपीएसमधून एनपीएसमध्ये परतू शकतो. त्यानंतर पुन्हा त्याची युपीएसमध्ये एन्ट्री होणार नाही. हा बदल निवृत्ती किमान एक वर्षे आधी वा व्हीआरएसच्या तीन महिने आधी करणे अनिर्वाय असेल. जर एखाद्या कर्मचाऱ्या विरोधात अनुशासनात्मक कारवाई सुरु असेल, किवा त्याला हटवले असेल, निलंबित केले असेल तर त्याला ही सुविधा मिळणार नाही. जो कर्मचारी निर्धारित केलेल्या वेळे आधी पर्याय निवडणार नाहीत. ते स्वत: युपीएसमध्ये रहातील.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.