AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक कोटीची लॉटरी लागली, पण तिकीटाचा मालक सापडेना, दवंडी पिटण्याची आली वेळ

एका व्यक्तीने लॉटरीचे तिकीट काढले आणि तो चक्क एक कोटीचे इनाम जिंकला आहे. मात्र, हा भाग्यवान विजेता बक्षिसाची रक्कम घेण्यास पुढे न आल्याने पंचाईत झाली आहे...त्याला दवंडी देऊन बोलावण्याची वेळ आली आहे.

एक कोटीची लॉटरी लागली, पण तिकीटाचा मालक सापडेना, दवंडी पिटण्याची आली वेळ
lottery ticket winner did not come to claim the prize
| Updated on: Nov 11, 2025 | 9:07 PM
Share

नशिबात असेल तर एखाद्याला इतकी संपत्ती मिळते की तिला ‘छप्पर फाडके’ बरसात म्हटले जाते. अनेकजण लॉटरीचे तिकीट काढून आपले नशीब आजमवत असतात. अशाच एकाला लॉटरीच्या सोडतीत तब्बल एक कोटीचे बक्षिस लागले… परंतू या लॉटरी तिकीटाचा मालक काही ही बक्षिसाची रक्कम घ्यायला आला नाही. त्यामुळे मोठी पंचाईत झाली आहे.  या लॉटरीच्या विजेत्याचा शोध घेण्यासाठी गावा-गावात ढोल वाजवून दवंडी पिटण्यात येत आहे.

पंजाबच्या लुधियाना शहरात एक कोटीची लॉटरी जिंकलेल्या विजेत्याची शोध घेतला जात आहे. त्यासाठीखास मोहिम राबविली जात आहे. ओमकार लॉटरी नावाच्या लॉटरी दुकानाचे मालक ढोल वाजवून या भाग्यशाली विजेत्याचा शोध घेत आहेत. त्याने सुमारे दोन हजार रुपयांचे तिकीट विकत घेतले होते. आणि या व्यक्तीच्या लॉटरी तिकीटाचा क्रमांक 7565 ला एक कोटीचे बक्षिस लागले आहे.परंतू हा विजेता बक्षिस घेण्यास आलेला नाही.

दुकानाचे मालकाने दिलेल्या माहितीनुसार तिकीट खरेदी करणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदवण्यास मनाई केली होती. यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण बनले आहे. लॉटरी कंपनीच्या वतीने शहरात जागोजागी दवंडी पिठवली जात आहे. त्यामुळे ही बातमी त्या लकी विजेत्या पर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्याच्याजवळ 7565 क्रमांकाचे लॉटरीचे तिकीट आहे त्याने विजयाची रक्कम घेऊन जावी असे म्हटले जात आहे.

लॉटरी विक्रेत्याने सांगितले की या विजेत्या तिकीटाची सोडत होऊ काही आठवडे झाले आहेत. नियमानुसार तिकीटाच्या बक्षिसावर दावा करण्यासाठी केवळ एक महिन्याची मुदत असते. जर या काळात तिकीट विजेता आला नाही तर इनामाची रक्कम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. कोणा अन्य व्यक्तीला हि रक्कम मिळणार नाही.लॉटरी दुकानाच्या मालकाने म्हटले आहे की ही पहिलीच वेळ नाही की या दुकानातून विक्री झालेल्या तिकीटावर बक्षिस लागले आहे. याच्या आधीही आपण विकलेल्या तिकीटांवर २० लाख आणि ५० लाखांचे बक्षिस लागले आहे असे दुकानाच्या मालकाने म्हटले आहे.

लॉटरी तिकीट विजेता सापडेना

दुकान मालकाने लोकांना अपिल केले आहे जर कोणाकडे 7565 क्रमांकाचे तिकीट असेल तर लागलीच संपर्क करावा. लुधियाणा शहरातील जागोजागी दवंडी दिली जात आहे. आता संपूर्ण शहरात हा भाग्यवान विजेता कोण आहे याची उत्सुकता लागलेली आहे. परंतू अद्यापही कोणी बक्षिसाची रक्कम घेण्यास पुढे आलेले नाही.

एका महिन्यात बक्षिस संपणार

आता जर येत्या काही दिवसात विजेता सापडला नाही. तर हे इनाम त्याच्या काहीही उपयोगाचे नाही. लुधियानातील लोकांनाही देखील या भाग्यवान लॉटरी तिकीट विजेत्या प्रतिक्षा लागून राहीली आहे. अखेर एक कोटी रक्कम कोणाला मिळणार याची औत्सुक्य कायम आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ