AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या सुंदर देशात भारताचे 10 हजार होतात 24 लाख, फक्त 2 हजारांमध्ये प्लॅन करा संपूर्ण ट्रीप

जगाच्या पाठीवर असे अनेक सुंदर देश आहेत, ज्या देशांमध्ये जावं, तेथील संस्कृती जवळून पहावी, तेथील पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आपण मनामध्ये या देशात जाण्याचा प्लॅन देखील बनवतो, मात्र अनेकदा भारत सोडून परदेशात जाणं हे खूप खर्चिक असतं, त्यामुळे आपण परदेशात जाणं टाळतो.

या सुंदर देशात भारताचे 10 हजार होतात 24 लाख, फक्त 2 हजारांमध्ये प्लॅन करा संपूर्ण ट्रीप
ट्रॅव्हल Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2025 | 6:43 PM
Share

पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे माणसानं आयुष्यात एकदा तरी गेलच पाहिजे, मात्र अशा ट्रीप या खूप खर्चिक असल्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही. भारत सोडून दुसर्‍या देशात जाण्यासाठी लागणारा खर्च हा आपल्याला परवडणारा नसतो, मात्र जगात असे देखील काही देश आहेत ते खूपच स्वस्त आहेत, तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल एवढ्या बजेटमध्ये देखील या देशाची ट्रीप करू शकता. पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. अनेकदा आपण जेव्हा अमेरिका किंवा ब्रिटनमध्ये जाण्याचा विचार करतो, तेव्हा तेथील चलन हे भारतीय रुपयांच्या तुलनेत खूपच मजबूत असल्यानं तो खर्च आपल्याला परवडणारा नसतो, जेव्हा रुपयाची तुलना डॉलरसोबत होते, तेव्हा एक डॉलर जवळपास 85 भारतीय रुपांबरोबर असतो. मात्र जगात असे काही देश आहे तेथील चलन हे भारतीय रुपयाच्या तुलनेत खूपच कमकुवत आहे, त्यामुळे अशा देशांची ट्रीप आपल्या बजेटमध्ये बसू शकतो.

असाच एक देश आहे तो म्हणजे लाओस, लाओस हा दक्षिण पूर्व आशियामधील एक सुंदर असा देश आहे. या देशामध्ये अनेक पर्यटनस्थळ आहेत. तुम्ही अंदाजे पाच ते सहा दिवसांमध्ये हा संपूर्ण देश सहज फिरून येऊ शकता. जर तुम्ही लाओसला जाण्याचा विचार करत असाल तर लाओसला जाण्यासाठीचं विमान भाडं देखील तुमच्या बजेटमध्येच आहे. लाओसची राऊंड ट्रीप सर्वसामान्यपणे 30 ते 35 हजारांपासून सुरू होते, तुम्ही तुमच्या बजेटनुसार विमान प्रवासाचा पर्याय निवडू शकता.

लाओस हा एक सुंदर देश आहे, येथील संस्कृती, पर्यटनस्थळं, नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतात. या देशात तुम्हाला सर्व गोष्टी अगदी स्वस्त मिळतील, इतक्या स्वस्त की जर तुमच्या कडे दोन ते तीन हजार रुपये असतील तर विमानाचं भाडं सोडून तुम्ही या देशाची आरामात ट्रीप करू शकता. इथे या सर्व गोष्टी स्वस्त असण्याचं मुख्य कारण म्हणजे लाओसमध्ये जे चलन वापरलं जातं त्याला लाओशियन कीप असं म्हणतात, या चलनाच्या तुलनेत रुपया खूपच मजबूत आहे, म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार रुपये असतील आणि तुम्ही ते लाओसमधील चलनासोबत एक्सचेंज केले तर तुम्हाला त्याबदल्यात तब्बल 24 लाखांपेक्षा अधिक लाओसचं चलन मिळू शकतं.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत