AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check : देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवरच हल्ला?, व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य काय ?

पंतप्रधान मोदी यांनी नुकताच हिरवा झेंडा दाखवलेल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांची एकच पळापळ झाल्याचे म्हटले जात आहे.

Fact Check : देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवरच हल्ला?, व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य काय ?
stone pelting at the first hydrogen train
| Updated on: Jul 20, 2026 | 8:47 PM
Share

जींद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर हल्ला झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका स्थानकात या ट्रेनवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याचा दावा या व्हिडीओ शेअर करणाऱ्याने केला आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात नेमके काय सत्य आहे हे पाहूयात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ जुलै रोजी हरयाणातील जींद रेल्वे स्थानकातून भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधनवर धावणाऱ्या ट्रेनला (नमो ग्रीन रेल) हिरवा झेंडा दाखवला होता. या ट्रेनच्या पहिल्याच दिवशी बिघाडाचा सामना करावा लागला होता.

नेमके सत्य काय ?

या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक करणारा व्हिडीओ समाजमाध्यम ‘एक्स’ वर व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओत अनेक तरुण स्थानकात उभ्या असणाऱ्या ट्रेनवर दगड भिरकवता दिसत आहेत. मात्र, यामागे कॉक्रोज जनता पार्टीचे लोक तर नाहीत ना असा सवाल या व्हिडीओला शेअर करणाऱ्याने केला आहे.  या ट्रेनवर नेमका कुठे आणि कोणी हल्ला केला याची माहिती अजून मिळालेली नाही. मात्र हा व्हिडीओ हायड्रोजन ट्रेनचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडीओतील इंजिन  WAG-12 आहे.  12,000 HP चे हे इलेक्ट्रिक फ्रेट लोकोमोटिव्ह असून त्यास इंडियन रेल्वे आणि एल्सटॉमने तयार केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजलेले नाही.

येथे पाहा व्हिडीओ –

हायड्रोजन ट्रेनचे तंत्रज्ञान – भारत पाचवा देश

Hydrogen Train चे तंत्रज्ञान जगात जपान, जर्मनी, फ्रान्स आणि चीननंतर वापरणारा भारत पाचवा देश ठरला आहे. या ट्रेनचे तंत्रज्ञान हायड्रोजन इंधनावर असल्याने वीजेची बचत मोठ्या प्रमाणावर होत असते. ही ट्रेन जींद ते सोनीपत दरम्यान धावत असून ८९ किमीचे अंतर साधारण २ तासांत पूर्ण केले जात आहे. या प्रवासात १२ ते १४ स्थानक आहेत. ट्रेनचा प्रवास अत्यंत स्वस्त म्हटला जात आहे. प्रवाशांसाठी तिकीट दर सर्वसामान्य गाड्यांप्रमाणेच म्हणजेच किमान ५ ते कमाल २५ रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...