Fact Check : देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवरच हल्ला?, व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य काय ?
पंतप्रधान मोदी यांनी नुकताच हिरवा झेंडा दाखवलेल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांची एकच पळापळ झाल्याचे म्हटले जात आहे.

जींद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर हल्ला झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका स्थानकात या ट्रेनवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याचा दावा या व्हिडीओ शेअर करणाऱ्याने केला आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात नेमके काय सत्य आहे हे पाहूयात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ जुलै रोजी हरयाणातील जींद रेल्वे स्थानकातून भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधनवर धावणाऱ्या ट्रेनला (नमो ग्रीन रेल) हिरवा झेंडा दाखवला होता. या ट्रेनच्या पहिल्याच दिवशी बिघाडाचा सामना करावा लागला होता.
नेमके सत्य काय ?
या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक करणारा व्हिडीओ समाजमाध्यम ‘एक्स’ वर व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओत अनेक तरुण स्थानकात उभ्या असणाऱ्या ट्रेनवर दगड भिरकवता दिसत आहेत. मात्र, यामागे कॉक्रोज जनता पार्टीचे लोक तर नाहीत ना असा सवाल या व्हिडीओला शेअर करणाऱ्याने केला आहे. या ट्रेनवर नेमका कुठे आणि कोणी हल्ला केला याची माहिती अजून मिळालेली नाही. मात्र हा व्हिडीओ हायड्रोजन ट्रेनचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडीओतील इंजिन WAG-12 आहे. 12,000 HP चे हे इलेक्ट्रिक फ्रेट लोकोमोटिव्ह असून त्यास इंडियन रेल्वे आणि एल्सटॉमने तयार केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजलेले नाही.
येथे पाहा व्हिडीओ –
India’s first hydrogen powered train was attacked with stones and damaged. Anyone who vandalizes a national asset like this cannot hide behind the label of Students.
pic.twitter.com/ZQ4WgBNMCz— Manish (@4evermanish) July 20, 2026
हायड्रोजन ट्रेनचे तंत्रज्ञान – भारत पाचवा देश
Hydrogen Train चे तंत्रज्ञान जगात जपान, जर्मनी, फ्रान्स आणि चीननंतर वापरणारा भारत पाचवा देश ठरला आहे. या ट्रेनचे तंत्रज्ञान हायड्रोजन इंधनावर असल्याने वीजेची बचत मोठ्या प्रमाणावर होत असते. ही ट्रेन जींद ते सोनीपत दरम्यान धावत असून ८९ किमीचे अंतर साधारण २ तासांत पूर्ण केले जात आहे. या प्रवासात १२ ते १४ स्थानक आहेत. ट्रेनचा प्रवास अत्यंत स्वस्त म्हटला जात आहे. प्रवाशांसाठी तिकीट दर सर्वसामान्य गाड्यांप्रमाणेच म्हणजेच किमान ५ ते कमाल २५ रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत.