इंडियन आर्मीने लगेच बदला घेतला, कुख्यात दहशतवादी लतीफ भट्टचं थेट एन्काउंटर कुलगाममध्ये राबवलं ऑपरेशन!

कुलगाम येथे झालेल्या जवानांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड लतीफ हाच होता. भारतीय जवानांनी केलेल्या या कारवाईबाबत सीआरपीएफचे एडीजी संदीप खिरवार यांनी सोमवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

इंडियन आर्मीने लगेच बदला घेतला, कुख्यात दहशतवादी लतीफ भट्टचं थेट एन्काउंटर कुलगाममध्ये राबवलं ऑपरेशन!
lalit bhatt
Image Credit source: Getty Images
| Updated on: Nov 16, 2026 | 3:09 PM

Latif Bhatt Encounter : भारतीय सेनेला जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे मोठी कारवाई केली आहे. लष्कराने येथे लष्कर ए तोयबाशी संबंधित असलेल्या दोन दहशतवाद्यांचे एन्काऊंटर केले आहे. सेनेच्या या कारवाईत लष्करचा टॉपचा कमांडर लतीफ भट्ट याचाही समावेश आहे. लतीफ भट्टचा अनेक भारतविरोधी करावायांत समावेश आहे. कुलगाममध्ये लष्करावर झालेल्या अलिकडच्या हल्ल्यातही या भट्टचा समावेश होता. त्याला कंठस्नान घातल्यानंतर आता लष्कर ए तोयबासाठी मोठा फटका असल्याचे बोलले जात आहे.

लतीफ भट याचा शोध घेतला जात होता

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सेनेने केलेल्या या कारवाईत सीआरपीएफचे जवान, जम्मू काश्मीरचे पोलीस यांचाही समावेश होता. काही दिवसांपूर्वी कुलगाममध्ये भारतीय जवानांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमद्ये सध्या सुरक्षाविषयक स्थिती नेमकी कशी आहे, याचा आढावा घेण्यासाठी CRPF चे DG ज्ञानेंद्र प्रताप सिंह काश्मीरमध्ये पोहोचले होते. एकीकडे लष्करचा ए तैयबाचा दहशतवादी मोहम्मद लतीफ भट याचा भारतीय जवानांकडून शोध घेतला जात होता. एकीकडे ही मोहीम चालू असतानाच दुसरीकडे ज्ञानेंद्र प्रताप सिंह काश्मीरला पोहोचले होते. त्यामुळे भारतीय जवानांकडून एखादी मोठी कारवाई केली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. हीच शक्यता आता खरी ठरली.

Loading...

संपूर्ण काश्मीरमध्ये जारी केला होता अलर्ट

कुलगाम येथे झालेल्या जवानांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड लतीफ हाच होता. भारतीय जवानांनी केलेल्या या कारवाईबाबत सीआरपीएफचे एडीजी संदीप खिरवार यांनी सोमवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनीद दिलेल्या माहितीनुसार 11 नोव्हेंबर रोजी जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता. हल्लेखोरांची माहिती आम्हाला अगोदरच मिळाली होती, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भारतीय जवानांनी राबवलेल्या या मोहिमेत लष्कर ए तैयबाचे दोन दहशतवादी मारले गेल्याने भारतासाठी हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कुख्यात दहशतवादी लतीफ भट्ट याचा जवानांनी खात्मा करण्यात आलाय. आता भारतीय जवान या भागात कोणते ऑपरेशन राबवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us