मग आधार, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र काय कामाचं? नागरिकता सिद्ध करण्यासाठी हाच लागणार कागद, अपडेट वाचली का?

Indian Citizenship Rules: आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक अथवा जमिनीची कागदपत्रे असतील तर भारतीय नागरीक असल्याचे सिद्ध होतं का? कोलकत्ता हायकोर्टाने याविषयीची एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. या कागदपत्रांना, दस्तावेजांना भारतीय नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा मानल्या जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मग कोणता लागणार कागद?

मग आधार, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र काय कामाचं? नागरिकता सिद्ध करण्यासाठी हाच लागणार कागद, अपडेट वाचली का?
भारतीय नागरिकत्व
| Updated on: Jul 31, 2026 | 9:59 AM

आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, शेतीचा सातबारा, जमिनीची कागदपत्रं असले म्हणजे तुमचे भारतीय नागरिकत्व सिद्ध होते का? कोलकत्ता हायकोर्टाने एका खटल्यात याविषयी मोठी टिप्पणी केली आहे. या कागदपत्रांना भारतीय नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एका व्यक्तीवर बांगलादेशी असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याने हायकोर्टात धाव घेतली. नागरिकत्व सादर करण्याची कायदेशीर जबाबदारी ही त्या व्यक्तीची असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्या व्यक्तीने नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सादर केलेली कागदपत्रं पुरेशी नसल्याचे स्पष्ट केले. मग नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणते कागद द्यावे लागतील.

काय आहे याचिका?

बांगलादेशी असल्याचा आरोप करत 18 जून 2026 रोजी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या काकाने कोलकत्ता हायकोर्टात धाव घेतली. चुकून आपल्या पुतण्याला ताब्यात घेण्यात आल्याचा याचिकेत दावा करण्यात आला. मतदार याद्यांच्या पुनर्परीक्षणादरम्यान (SIR) त्याचे नाव मतदार यादीतून बाद करण्यात आले होते. त्याने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. तिथे सुनावणी प्रलंबित असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे म्हणणे त्याने सादर केले.

नागरिकता सिद्ध करण्याचा कायदा सांगतो काय?

स्थलांतर आणि परदेशी नागरिक कायद्यानुसार (इमिग्रेशन अँड फॉरनेर्स ॲक्ट,2025) असा कोणताही एक दस्तावेज निश्चित नाही की, त्यामुळे प्रत्येक स्थितीत भारतीय नागरिकत्वाचे तो अंतिम पुरावा मानल्या जाईल. एका कागदपत्रावर ते निश्चित मानले जाणार नाही.

भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्रे महत्त्वाची

जन्म प्रमाणपत्र आणि भारतीय कायद्यानुसार आई-वडीलांचा नागरिकत्वाचा पुरावा

वंशपरंपरेनुसार पिढ्यांच्या आधारे भारतीय नागरिकत्वाचे दस्तावेज

केंद्र सरकारकडून सादर नागरिकत्वाचे प्रमाणपत्र

आधार, पॅन आणि मतदान ओळखपत्र नाही निर्णायक पुरावा?

आधार कार्ड केवळ ओळखपत्र आणि निवासाचा दस्तावेज, नागरिकत्वाचा नाही

PAN कार्ड आयकर, प्राप्तिकरासाठीचे ओळखपत्र

मतदान ओळखपत्र हे व्यक्तीचे नाव मतदान यादीत आहे की नाही हे दर्शवते, त्यामुळे नागरिकत्व सिद्ध होत नाही

पासपोर्ट हा प्रवासासंबंधीचा दस्तावेज आहे. परराष्ट्र मंत्रालयानुसार पासपोर्ट हा भारतीय नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा नाही

कोर्टाने हे स्पष्ट केले की, केवळ आधार, पॅन आणि मतदान ओळखपत्र हे दस्तावेज पुरेश नाहीत. तर मूळ पूरक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us