AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनमध्ये हवी साईड लोअर सीट? मग या 4 ट्रिक वापरा, सीट मिळालीच म्हणून समजा

Train side lower seat booking tricks: रेल्वेत दूरचा प्रवास असला की साईड लोअर सीटची आठवण हमखास होते. जर हे आसान मिळाले तर आनंद होतो. कारण मग प्रवासात चढउतर करण्याची इतकी गरज भासत नाही. या ट्रिकमुळे तुम्हाला लोअर सीट मिळू शकते.

ट्रेनमध्ये हवी साईड लोअर सीट? मग या 4 ट्रिक वापरा, सीट मिळालीच म्हणून समजा
रेल्वे सीट बुकिंगImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 05, 2026 | 3:43 PM
Share

Train Ticket Seat Selection Tips: भारतात दूरच्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय समोर येतो. त्यात खिडकी असणारी सीट मिळाली तर भारताच्या लोकसंस्कृतीचे दर्शन होते आणि प्रवास कधी संपतो तेही कळत नाही. त्यामुळे प्रवासात साईड लोअर सीटसाठी (Side Lower) अनेकांचा आग्रह असतो. अनेकांना वाटतं की साईड लोअर सीट मिळणे हा नशीबाचा भाग आहे. पण तसे नाही. IRCTC ॲप आणि साईटवर काही स्मार्ट पद्धतीने आणि बुकिंग नियमामुळे तुम्हाला हे आसन मिळू शकते. काय आहे त्या टिप्स?

‘Reservation Choice’ फीचरचा योग्य वापर

जेव्हा तुम्ही IRCTC ॲप अथवा साईटवर तुमची सविस्तर माहिती नोंदवता, तेव्हा सर्वात खाली स्क्रोल केल्यावर ‘Other Preferences’ वा ‘Reservation Choice’ हा एक पर्याय दिसतो. पण अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. खरंतर इथंच तुम्हाला दडलेली एक संधी मिळते. तुम्ही तिकीट बुक करताना ‘Berth Preference’ मध्ये Side Lower (SL) निवडा. त्याच्या खालच्या बाजूला ड्रॉपडाउन मेन्यू असतो. त्यात लिहिलेले असते की, ‘Book only if requested berth is allotted’ म्हणजे तिकीट तेव्हाच मिळेल, जेव्हा मागितलेली सीट, आसन मिळेल. जर तुम्ही हा पर्याय निवडला तर, सिस्टिम तुम्हाला लोअर सीट, आसन मिळवून देण्याचा प्रयत्न करते. जर अशी जागा उपलब्ध नसेल तर मग तिकीट बुक होत नाही. तुमचे पैसे सुद्धा अडकून पडत नाही.

कोटा नियमामध्ये मदत

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, लोअर आणि साईड लोअर सीट काही खास लोकांसाठी आरक्षित ठेवण्यात येते. हा कोटा (Quota) 60 वर्षांवरील पुरूष, 45 वर्षांवरील महिला आणि गर्भवती (Pregnant) महिलांसाठी असतो. जर तुम्ही आई-वडील अथवा आजी-अजोबासाठी तिकीट बुक करत असाल तर नेहमी ‘General Quota’ ऐवजी ‘Ladies’ अथवा ‘Senior Citizen’ कोटा निवडा. या कोट्यात बुकिंग करताना सिस्टिम सर्वात अगोदर साईड लोअर आणि नंतर लोअर सीट देते.

वेळेचे मोठे महत्त्व

रेल्वेचे आसन देताना सॉफ्टवे्अर (Algorithim) एका खास पद्धतीने काम करते. ते ट्रेनमधील सीटचे व्यवस्थापन करते. सिस्टिम अगोदर ट्रेनच्या मधल्या भागातील सीट बुकिंगवर अगोदर जोर देते. जेव्हा तुम्ही प्रवासाच्या 2-3 महिने अगोदर (Advance Booking) तिकीट बुक करता तेव्हा ट्रेनचे बुकिंग पूर्ण झाले नसल्याने तेव्हा तुमची ‘Side Lower’ ची विनंती लागलीच मान्य होते. तुमचे आसन बुक करण्यात येते. पण प्रवासाच्या अगदी जवळपास असं सीट मिळणे थोडे अवघड होते.

चार्ट तयार झाल्यावर उरलेल्या सीटवर दावा

अनेकदा ज्येष्ठ नागरीक आणि व्हीआयपीसाठी लोअर सीट राखीव असतात. पण त्या बुक न झाल्यास शिल्लक राहतात. रेल्वेचा प्रवास सुरू होण्यापूर्वी पहिला चार्ट लावला जातो. तेव्हा IRCTCॲप अथवा साईटवर ‘Train Berth Availability’ वा ‘Charts/Vacancy’ हा पर्याय निवडून त्यावर साईड लोअर सीटचा अंदाजा घ्या आणि Current Booking च्या माध्यमातून बुक करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, जागांची माहिती आणि उपलब्धता भारतीय रेल्वेच्या सॉफ्टवेअर आणि जागांच्या उपलब्धेनुसार कळते. प्रवासदरम्यान नियमातील बदलासाठी रेल्वेची अधिकृत साईट तपासा.)

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी