रेल्वेत प्रवास करताना खाण्याची चिंता विसरा, पाहा रेल्वेच्या नवीन मेन्यूत काय मिळणार

रेल्वेत जेवणाची चिंता विसरा. रेल्वेने आपल्या मेन्यूबदल बदल केला आहे. यामुळे तुम्हाला हवे असणारे खाद्य पदार्थ मिळणार आहे. अगदी मधूमेह रुग्णांनाही त्यांच्यांसाठीचे पदार्थ मिळणार आहे. 

रेल्वेत प्रवास करताना खाण्याची चिंता विसरा, पाहा रेल्वेच्या नवीन मेन्यूत काय मिळणार
अवघा दोन वर्षांचा असताना पासून तो रेल्वेने प्रवास करतोय. तिथूनच त्याच्या मनात रेल्वे विषयी आवड निर्माण झाली. याच आवडीतून त्याने शाळेत असल्यापासून रेल्वे इंजिन्सच्या प्रतिकृती साकारायला सुरुवात केली.
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 25, 2023 | 1:09 PM

नवी दिल्ली : रेल्वेने लांब (indian railways)पल्ल्याचा प्रवास करताना जेवणाची चिंता अनेकांना असते. प्रवासात हवे तसे चांगले जेवण मिळाले नाही तर? यामुळे घरुनच प्रवासाला जाताना मुबलक खाद्यसाठा तयार केला जातो. परंतु आता रेल्वेत जेवणाची चिंता विसरा. रेल्वेने आपल्या मेन्यूबदल बदल केला आहे. यामुळे तुम्हाला हवे असणारे खाद्य पदार्थ मिळणार आहे. अगदी मधूमेह रुग्णांनाही त्यांच्यांसाठीचे पदार्थ मिळणार आहे.

रेल्वेने मेन्यूमध्ये बदल करताना विविध लोकांचा विचार केला आहे. जैन समाजासाठी (jain food)कांदा, लसूण नसणारे जेवण असणार आहे. इडली सांबर, मसाले डोसा, वडापाव, पावभाजी, भेळपुरी, खिचडी, शाकाहारी पदार्थांची मेजवाणी मिळणार आहे. जैन समाजासाठी कांदा, लसूण नसणारे व्यंजन बनवण्यात येणार आहे.

मधूमेह रुग्णांसाठी काय

रेल्वेने मधूमेह रुग्णांचाही (diabetes food)विचार केला आहे. उकळलेल्या भाज्या, ओट्स मिळणार आहे. दूध ओट्स, दूध कार्नफ्लेक, शुगर फ्री चहा, कॉफी देणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजरा वर्षानिमित्त बाजरापासून तयार पदार्थही मिळणार आहे. नवीन बदल करताना लहान मुलांचाही विचार केला आहे. बेबी फूडचा समावेश मेन्यूत करण्यात आला आहे. मेन्यूमधील हा बदल २६ जानेवारीपासून सर्व प्रिमियम गाड्या, राजधानी, शताब्दी, दूरंतो आणि वंदे भारत गाड्यांमध्ये करण्यात येणार आहे.

२०१९ मध्ये केला बदल
रेल्वेने आपल्या मेन्यूत यापुर्वी २०१९ मध्ये बदल केला आहे. तब्बल तीन वर्षानंतर मेन्यू कार्डमध्ये बदल रेल्वेने बदल केला. त्यामुळे बदललेली परिस्थिती व इतर सर्व घटन यांचा विचार केला आहे. या बदलामुळे रेल्वे प्रवासांचा प्रवास सुखकारक होणार आहे.