AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आणखी एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा, बड्या नेत्याचा तडकाफडकी निर्णय, कारण काय?

Modi Cabinet Minister L Murugan Resignation: एल. मुरुगन यांचा मंत्रीपदासह राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांनी मंत्रिपद आणि राज्यसभा दोन्ही सोडले आहे.

मोठी बातमी! आणखी एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा, बड्या नेत्याचा तडकाफडकी निर्णय, कारण काय?
| Updated on: Oct 13, 2026 | 6:32 PM
Share

माहिती व प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आपल्या मंत्रीपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा, अशा दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हे दोन्ही राजीनामे एकाच वेळी सादर केले. एल. मुरुगन यांनी केंद्र सरकारमध्ये दीर्घकाळ राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्याकडे माहिती व प्रसारण मंत्रालय तसेच संसदीय कामकाज मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यांनी दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी तामिळनाडूमध्ये भाजपला मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली . त्यांनी लिहिले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारतमातेची आणि तामिळनाडूची सेवा करणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. एका रोजंदारी मजुराचा मुलगा असण्यापासून ते केंद्रीय मंत्रिमंडळात सेवा करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हे त्यांचे सर्वात मोठे सौभाग्य आहे.

मुरुगन यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, त्यांना आता तळागाळात परतायचे आहे. त्यांना आपल्या कार्यकर्त्यांसोबत उभे राहायचे आहे आणि तामिळनाडूमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी आपला पूर्ण वेळ द्यायचा आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पक्षाचा विस्तार करणे हे त्यांचे प्राधान्य आहे, असं त्यांनी लिहिले आहे.

एल. मुरुगन २०२१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले होते. त्यानंतर २०२४ मध्ये ते दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आले. त्यांच्या राजीनाम्यामुळे तामिळनाडूतील त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होईल. राजकीय वर्तुळात असा विश्वास आहे की, मुरुगन आता राज्य स्तरावर पक्षाची संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतील. मुरुगन यांच्या तळागाळातील सहभागामुळे पक्षाची संघटनात्मक रचना मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!