AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता उत्तर भारतातही होणार ‘ईशा ग्रामोत्सव’, 80 हजार खेळाडू होणार सहभागी

सद्गुरूंनी स्थापन केलेल्या 'ईशा आऊटरीच'च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारा देशातील सर्वात मोठा वार्षिक ग्रामीण क्रीडा महोत्सव,'ईशा ग्रामोत्सव', आता उत्तर भारतातील गावांमध्ये देखील सुरू होणार आहे. दक्षिण भारतातील ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेली ही क्रीडा स्पर्धा, प्रथमच उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातही आयोजित केली जाणार आहे.

आता उत्तर भारतातही होणार 'ईशा ग्रामोत्सव', 80 हजार खेळाडू होणार सहभागी
Isha GramotsavaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 15, 2026 | 10:13 PM
Share

सद्गुरूंनी स्थापन केलेल्या ‘ईशा आऊटरीच’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारा देशातील सर्वात मोठा वार्षिक ग्रामीण क्रीडा महोत्सव,’ईशा ग्रामोत्सव’, आता उत्तर भारतातील गावांमध्ये देखील सुरू होणार आहे. दक्षिण भारतातील ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेली ही क्रीडा स्पर्धा, प्रथमच उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातही आयोजित केली जाईल. हा क्रीडा महोत्सव दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित होणार आहे. यंदा सुमारे 40,000 गावांमधील 80,000 खेळाडू 7000 संघाच्या माध्यमातून या खेळ महोत्सवात सहभागी होणार आहेत. यामध्ये जवळपास 15 हजार महिला खेळाडू देखील आपला सभाग नोंदवणार आहेत.

या खेळ महोत्सवात महाअंतिम फेरीत विजेत्या ठरलेल्या व्हॉलीबॉल आणि थ्रोबॉलच्या विजेत्या संघाला प्रत्येकी 5 लाख रुपयाचे रोख बक्षीस मिळणार आहे, तर उपविजेत्या संघाला प्रत्येकी तीन लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. तर जे संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहतील त्या संघाला अनुक्रमे एक लाख आणि पन्नास हजार रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. क्लस्टर आणि विभागीय टप्प्यांमध्येही रोख बक्षिसे दिली जाणार आहेत, तसेच पॅरालिम्पिक श्रेणीसाठी देखील विशेष बक्षिसे राखून ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धांसाठी बक्षीस म्हणून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूंच्या गुणांना वाव मिळणार आहे.

खेळाडू व्हॉलीबॉल (पुरुष) आणि थ्रोबॉल (महिला) स्पर्धांसाठी नोंदणी करू शकतात. ही स्पर्धा बहुस्तरीय स्वरूपात आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये क्लस्टर-स्तरीय सामने, विभागीय फेऱ्या आणि एक भव्य अंतिम सामना यांचा समावेश असेल. क्लस्टर सामने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतील, तर अंतिम सामना 6 सप्टेंबर रोजी कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात, सद्गुरूंच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये, पाच ठिकाणी क्लस्टर-स्तरीय सामने आयोजित करण्यात येणार आहेत. पहिला टप्पा 25-26 जुलै रोजी लखनौ, वाराणसी, मुझफ्फरनगर आणि मेरठ येथे पार पडेल, त्यानंतर 1 आणि 2 ऑगस्ट रोजी गौतम बुद्ध नगर येथे विभागीय सामने होणार आहेत. तर दुसरीकडे हरियामध्ये क्लस्टर-स्तरीय सामने 25 आणि 26 जुलै रोजी पानिपत, कर्नाल आणि अंबाला येथे होणार आहेत. क्लस्टर सामन्यांचा पुढील टप्पा 1 आणि 2 ऑगस्ट रोजी हिसार आणि कुरुक्षेत्र येथे पार पडेल. विभागीय टप्पा 9 ऑगस्ट रोजी कर्नाल येथे होणार असून, त्यात विभागातील सर्व जिल्ह्यांचे संघ सहभागी होतील. ईशा ग्रामोत्सव 2026 साठी नोंदणीला सुरुवात झाली असून, ग्रामीण क्षेत्रातील खेळाडू ishagramotsavam.sadhguru.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे, तसेच अधिक माहितीसाठी 9654663702 या नंबरवर कॉल करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक