AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांची संपत्ती किती? एकही कार नाही, अंगावर 8 गुन्हे, प्रतिज्ञापत्रातून महत्त्वाची माहिती समोर

prashant kishor asset : प्रशांत किशोर यांनी पोटनिवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र सादर केलं. या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपूर्ण संपत्तीची माहिती समोर आली आहे.

राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांची संपत्ती किती? एकही कार नाही, अंगावर 8 गुन्हे, प्रतिज्ञापत्रातून महत्त्वाची माहिती समोर
| Updated on: Jul 14, 2026 | 2:47 PM
Share

बिहारच्या पोटनिवडणुकीत जन सुराज पार्टीने एन्ट्री मारली आहे. मागच्या वेळी प्रशांत किशोर यांनी निवडणूक लढवली नाही. परंतु यंदा प्रशांत किशोर यांनी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बांकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्तीविषयी माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

प्रशांत किशोर यांची संपत्ती किती?

बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिज्ञापत्रातून 197.99 कोटींची संपत्तीची घोषणा केली आहे. या संपत्तीत त्यांची पत्नी डॉ. जान्वही दास यांच्या संपत्तीचाही समावेश आहे. प्रशांत किशोर यांच्याकडे 96.06 कोटींची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. तर पत्नी डॉ. जानव्ही दास यांच्याकडे 109.93 कोटींची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. या दोघांनी अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार, प्रशांत किशोर आणि त्यांच्या पत्नीकडे 111.78 कोटी किंमतीची जंगम मालमत्ता आहे. स्थावर मालमत्तेचे मूल्य अंदाजे 86.29 कोटी रुपये इतकी आहे. प्रशांत किशोर यांची वैयक्तीक जंगम मालमत्ता 22.19 कोटी रुपये इतकी आहे. तर पत्नीकडे अंदाजे 89.51 कोटींची जंगम मालमत्ता आहे. किशोर यांच्याकडे 65,570 रुपये रोख रक्कम आहे. तर पत्नीकडे 195200 रोख आहे. त्यांनी स्टॉक्स, म्युच्युअल फंड, बॉण्ड्स आणि विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच प्रशांत किशोर यांनी प्रतिज्ञापत्रात स्वत:ची कार नसल्याचा उल्लेख केला आहे.

प्रशांत किशोर यांचे गुवाहाटीत 2 फ्लॅट आहेत. नोएडामध्ये देखील प्रॉपर्टी आहे. गाझियाबादमधील अपार्टमध्ये 2 फ्लॅट आहेत. पाटणा, दिल्लीतही प्रॉपर्टी आहे. प्रतिज्ञापत्रात प्रशांत किशोर यांच्याविरुद्ध काही गुन्हे देखील दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध फौजदारी आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी असे एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधात पाटणा, बेतिया, बिहारमधील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या खटल्यात त्यांना दोषी ठरवण्यात आलेले नाही.

Follow Us
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'