AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी, एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू

कधी काय होईल सांगता येत नाही. असंच काही आर्यन याच्या आई - वडिलांसोबत झालं आहे. आई - वडिलांनी आर्यन याला कृष्णासारखं सजवलं पण त्याच्या गळ्यातली माळच जीवघेणी ठरली... माळेतील एका मण्याने आर्यनया जीव घेतला.

कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी, एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
| Updated on: Sep 05, 2026 | 11:39 AM
Share

जन्माष्टमीमुळे अनेक आई – वडील त्यांच्या मुलांना कृष्णासारखं सजवतात. आर्यन याच्या आई – वडिलांनी देखील त्यांच्या मुलाला कृष्णासारखं सजवलं होतं. आई – वडिलांना सहा वर्षांच्या आर्यन याला कृष्णाचा ड्रेस घातला आणि गळ्यात एक माळ घातली. अशात गळ्यात घातलेल्या माळेतील एक मणी आर्यन याने गिळला, ज्यामुळे त्याचं निधन झालं. असं देखील सांगितलं जात आहे की, श्वासनलीकेत मणी अडकल्यामुळे आर्यन याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याचा मृत्यू झाला. सर्वात धक्कादायक सत्य म्हणजे आर्यन त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

कृष्णवेशात सजलेला आर्यन

जन्माष्टमीनिमित्त देशभरात मुलांना भगवान श्रीकृष्णाच्या वेशभूषेत सजवलं जात होतं. याचप्रमाणे, रोहतास जिल्ह्यातील भागीरथ गावातील रहिवासी विमलेश यादव यांनी आपला सहा वर्षांचा मुलगा आर्यन यादव याला ‘कान्हा’च्या वेशभूषेत सजवलं. आर्यन याने पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते आणि गळ्यात मोत्यांची माळ घातली होती. आपल्या एकुलत्या एका मुलाला कृष्णवेशात पाहून कुटुंबाला खूप आनंद झाला आणि संपूर्ण घरात जन्माष्टमीचा उत्साह संचारला.

माळेचा मणी गिळल्याने प्रकृती बिघडली

आर्यन याने गळ्यात घातलेल्या जपमाळेचा एक मणी गिळल्याची मााहिती समोर आली आहे. मणी गिळताच त्याची प्रकृती बिघडू लागली. यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेले. रुग्णालयात उपचार सुरु असताना आर्यन याचं निधन झालं. सर्वांना असं वाटलं की, उपचारानंतर आर्यन याची प्रकृती स्थिर होईल. पण असं झालं नाही. एका मणी आर्यन याच्यासाठी काळ ठरला. अखेर वेळ आल्यानंतर आर्यन याने शेवटचा श्वास घेतला.

मुलांना सजवताना काळजी घ्या…

आर्यनच्या मृत्यूमुळे मुलांना सजवताना घ्यावयाच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. मुलांच्या गळ्यात हार, मण्यांच्या माळा, लहान दागिने किंवा अशी कोणतीही वस्तू घालताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, जी मुले सहजपणे आपल्या तोंडात घालू शकतात. जन्माष्टमीनिमित्त आपल्या मुलाला ‘कान्हा’च्या वेशभूषेत सजवून हा दिवस आनंदी आणि अविस्मरणीय बनवण्याचा त्या कुटुंबाचा मानस होता; मात्र, तो दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शोकांतिकेत बदलला.

Follow Us
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी