AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 वर्षीय मुलीने बनवला अवघ्या 1800 रुपयांत ‘देसी एसी’; वीजबिलाचीही चिंता नाही

बुंदेलखंडसारख्या उष्ण प्रदेशात उन्हाळ्यातील तापमान अनेकांसाठी मोठं आव्हान ठरतं. प्रत्येकाला महागडा एसी घेणं शक्य नसतं. अशा परिस्थितीत कल्याणीने आपल्या आजूबाजूच्या समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं आणि कमी खर्चात थंडावा देणारं उपकरण तयार करण्याचा प्रयत्न केला.

16 वर्षीय मुलीने बनवला अवघ्या 1800 रुपयांत 'देसी एसी'; वीजबिलाचीही चिंता नाही
16 वर्षीय मुलीने बनवला 1800 रुपयांत एसी Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 22, 2026 | 11:45 AM
Share

उन्हाळा सुरू झाला की वाढत्या तापमानापासून दिलासा मिळवण्यासाठी अनेक जण एअर कंडिशनरचा (AC) वापर करतात. मात्र, एसीची किंमत आणि वाढणारं वीजबिल यामुळे अनेक कुटुंबांना तो विकत घेणं परवडत नाही. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील झाशी इथल्या कल्याणी श्रीवास्तव या तरुणीने आपल्या कल्पकतेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने केवळ 1800 रुपयांत कमी खर्चात थंडावा देणारं उपकरण तयार केलं. तिच्या या उपकरणाला ‘देसी एसी’ असं नाव देण्यात आलं. विशेष म्हणजे, या उपकरणामुळे तासाभरात खोलीचं तापमान सुमारे 4 ते 5 अंश सेल्सिअसने कमी होऊ शकतं, असा दावा करण्यात आला आहे.

कल्याणी श्रीवास्तवने तयार केलेलं हे उपकरण पारंपरिक एअर कंडिशनरपेक्षा वेगळं आहे. सामान्य एसीमध्ये रेफ्रिजरेशन यंत्रणेचा वापर करून खोलीतील उष्णता बाहेर टाकली जाते. मात्र, कल्याणीच्या उपकरणात साध्या साहित्याचा वापर करून थंड हवा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपकरणामध्ये थर्माकोलपासून तयार केलेल्या बर्फाच्या पेटीचा आणि 12 व्होल्टच्या डीसी फॅनचा वापर करण्यात आला आहे. पेटीतील थंड भागातून हवा पुढे पाठवली जाते आणि एका विशिष्ट आकाराच्या पाइपमधून ती बाहेर सोडली जाते. त्यामुळे खोलीत थंडावा निर्माण होण्यास मदत होते.

हर्ष गोएंका यांची पोस्ट-

या उपकरणाची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्याची कमी किंमत. अवघ्या 1800 रुपयांत तयार झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही अशा पर्यायाचा विचार करता येऊ शकतो. कल्याणीच्या या प्रयोगाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सौरऊर्जेचा वापर. योग्य सौरऊर्जा व्यवस्थेच्या साहाय्याने उपकरणातील फॅन चालवता येतो. त्यामुळे घरातील नियमित वीजपुरवठ्यावर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊ शकते.

महागड्या एसीमुळे दर महिन्याला वाढणारं वीजबिल अनेकांसाठी चिंतेचा विषय असतो. ग्रामीण भागातील आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना आर्थिक अडचणींचाही विचार करावा लागतो. अशा कुटुंबांसाठी कमी खर्चात थंडावा देणारे पर्याय विकसित करण्याची गरज आहे.

कल्याणीच्या कल्पकतेची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली. तिच्या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावरील मॉडेल स्पर्धेसाठी आयआयटी दिल्लीकडून निवड झाल्याचं वृत्त आहे. कल्याणीचं वैशिष्ट्य केवळ विज्ञानातील प्रयोगांपुरते मर्यादित नाही. ती एक उत्तम गायिकाही आहे. तिने ‘इंडियन आयडॉल’ या लोकप्रिय गायन कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तसंच लखनौ, आग्रा आणि कानपूर इथल्या गायन स्पर्धांमध्ये तिने अनेक पारितोषिकं जिंकली होती.

Follow Us
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?