AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंधार विमान अपहरण ते टायगर श्रॉफ गोळीबार, नेपाळच का आहे गुन्हेगारांचं नंदनवन?

भारतात गुन्हे केल्यानंतर गुन्हेगारांचे नेपाळमध्ये पळून जाणे ही आता नेहमीची गोष्ट बनली आहे, कारण दोन्ही देशांमधील सहज ओलांडता येणारी सीमा आणि गुंतागुंतीचे प्रत्यार्पण कायदे आरोपींना फायद्याचे ठरतात. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया

कंधार विमान अपहरण ते टायगर श्रॉफ गोळीबार, नेपाळच का आहे गुन्हेगारांचं नंदनवन?
NEPAL
| Updated on: Oct 20, 2026 | 5:27 PM
Share

भारतात कोणताही मोठा गुन्हा केल्यानंतर अनेक प्रकरणात आरोपी नेपाळच्या दिशेने पळतात या मागे नेमके कारण काय ? कंधार विमान अपहरण ते टायगर श्रॉफ प्रकरणातील आरोपी यांना नेपाळच खुणावत होते. राजस्थानच्या कोटा येथे हे आरोपी सापडले, मात्र, त्यांना नेपाळमधून बाहेर पलायन करायचे होते ही माहिती उघडकीस आली आहे. भारत आणि नेपाळची मोकळी सीमा, प्रत्यार्पण कायद्यातील जटिलता आणि स्थानिक पातळीवर मिळणारी मदत आरोपींना सहज सीमापार करण्यास फायद्याची ठरत असते. अखेर नेपाळची सीमा गुन्हेगारांसाठी नंदनवन का आहे हे या लेखात पाहूयात…

भारत-नेपाळची खुली सीमा वरदान-

नेपाळ आणि भारत या दरम्यान १,७५१ किमीची सीमा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, प.बंगाल आणि सिक्कीम सारख्या पाच राज्यातून जाते. यात उत्तर प्रदेशाला लागून असलेली सीमा रेषा सर्वात लांब ( ६५१ किमी ) आहे आणि प.बंगालशी लागून असलेली सीमा सर्वात छोटी आहे. या संपूर्ण सीमेवर दोन्ही बाजूना अनेक चेक पोस्ट आहेत. परंतू विशाल सीमारेषा असल्याने अनेक जागी टेहळणी करणे सोपे नसल्याने गु्न्हेगारांना फायदा मिळतो. कोणत्याही कागदी कारवाई शिवाय भारतीय सीमा ओलांडून नेपाळच्या आतमध्ये सहज दाखल होऊ शकतात आणि आपली ओळख लपवण्यात यशस्वी होतात.

नेपाळमध्ये गुन्हेगार आरामात राहातात

भारतातील अनेक राज्ये खासकरुन बिहार आणि उत्तर प्रदेशातील पोलिस ठाण्यातील वॉण्टेड आरोपी जेव्हा नेपाळला पोहचतात तेव्हा तेथे त्यांच्यावर कोणताही जुना गुन्हा नोंदलेला नसतो. या स्थितीचा लाभ उठवत ते नेपाळमध्ये सर्वसामान्य नागरिक, प्रतिष्ठीत व्यवसायी आणि गुंतवणूकदार म्हणून वसतात. तेथे जाऊन ते बनावट कागदपत्रे आणि स्थानिक मदतीच्या आधारे वैध पद्धतीने राहतात. कायद्याच्या नजरेत नेपाळमध्ये त्यांचा रेकॉर्ड स्वच्छ असल्याने ते न घाबरतात खुलेपणाने फिरतात आणि भारता विरोधातील कारवाया आणि स्वत:च्या गुन्हेगारीचे नेटवर्क ऑपरेट करत रहातात.

प्रत्यार्पण करारातील अडचणी

जर एखादा भारतीय गुन्हेगार नेपाळला पळून जाण्यात यशस्वी झाला तर त्याला पुन्हा भारतात आणणे कठीण असते. दोन्ही देशात प्रत्यार्पण करार आणि कायदेशीर करार खूप जुने आणि जटिल मानले जातात.भारतीय एजन्सींना नेपाळमध्ये लपलेल्या कोणत्याही फरार आरोपींना पुन्हा भारतात आणण्यासाठी इंटरपोलद्वारा रेड कॉर्नर नोटिस आणि दीर्घ राजकीय प्रक्रियेतून जावे लागते. अनेकदा कागदी कारवाई आणि कायदेशीर डावपेच दीर्घकाळ चालतात. त्यामुळे तेथून आरोपींना डिपोर्ट करण्यास अनेक महिने आणि वर्षे लागतात. ज्यामुळे त्यांना भारतीय कायद्याच्या कचाट्यातून वाचण्याची संधी मिळते.

कंधार अपहरण आणि नेपाळ

२४ डिसेंबर १९९९ रोजी झालेल्या इंडियन एअरलाईन्सच्या IC 814 (काठमांडू ते नवी दिल्ली) विमान अपहरण प्रकरणात नेपाळ हे या संपूर्ण कटाचे मुख्य केंद्र बनले होते. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI आणि दहशतवादी संघटना हरकत-उल-मुजाहिदीन यांनी नेपाळच्या भौगोलिक परिस्थितीचा आणि सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींचा गैरफायदा घेऊन हा हायजॅकचा कट रचला होता. पाच अतिरेकी बनावट तिकीटा आधारे नेपाळमध्ये या विमानात मोठा शस्रसाठी घेऊन चढण्यात यशस्वी झाले होते. कंधार विमान अपहरणाच्या बदल्यात भारताने तीन अतिरेक्यांना मुक्त केले होते. त्यात मौलान मसूद अझहर (Maulana Masood Azhar), अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर यांचा समावेश होता.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!