अब्जाधीस सासऱ्याला संपवण्यासाठी 5 महिने प्लानिंग, A फसला, प्लान B अयशस्वी; अखेर C नुसार ..कानपूर हत्याकांडाचा थरारक खुलासा
कानपूरमध्ये स्वत:च्याच सासऱ्याची सुपारी देऊन हत्या करवणाऱ्या सुनेने त्यांना मारण्यासाठी तब्बल 3 प्लान आखले होते. गेल्या पाच महिन्यांपासून याची तयारी सुरू होती.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये अब्जाधीश औषध व्यापाऱ्याच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या आरोपींनी तोंड उघडत या प्रकरणी अनेक खुलासे केले आहेत. त्या व्यापाऱ्याच्या सुनेने आपल्याच सासऱ्यांना संपवण्यासाठी एक-दोन नव्हे तर ए, बी, सी असे तब्बल 3 प्लान आखले होते. प्लान ए हा घराबाहेरचा होता. त्यामुळे तो अमलात आणण्याचा सर्वात जास्त धोका सुपारी किलरला होता. त्यामुळे त्यांनी त्यास नकार दिला. तर बी आणि सी हा प्लान घरातलाच होता. मात्र व्यापारी मिनोचा घरी आले आणइ त्यांनी सुनेच्या खोलीचा जदिवा लावल्याने तो प्लानही फेल झाला. अखेर प्लान सी प्रमाणे आरोपींनी चाकूने त्यांची हत्या केली. या हत्याकांडासाठी तब्बल पाच महिन्यांपासून प्लानिंग सुरू होतं, अशी माहिती समोर आली.
कल्याणपूरच्या रतन ऑर्बिट मध्ये राहणारे औषधांचे व्यापारी विनीत मिनोचा यांची शनिवारी रात्री चाकून वार करून हत्या करण्यात आली.पहाटे चारच्या सुमारास त्यांचा मुलगा सुब्रत आणि सूनबाई शालू घरी पोहोचल्यावर, विनीत यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आलं. पोलिसांनी वेगनाने तपासाची तक्र फिरवत अवघ्या 8 तासांमध्ये हत्याकांडाचा खुलासा करत आरोपींना बेड्या ठोकल्या. मात्र त्याच्या कबुलूतून धक्कादायक माहती समोर आली. विनीत यांच्या हत्येची सुपारी, त्यांच्याच सुनेने, शालून दिल्याचं उघड झालं. तिने फेथफुलगंजच्या नुनिया मोहालचे निवासी विशाव गौतम आणि राजकिशोर यांना 6 लाखांची सुपाी दिली. विशाल हा आधी याच घरात नोकर म्हणून काम करत होता. सासरे विनीत यांचं टोकणं आणि खर्चाचा, प्रत्येक पैशांचा हिशोब मागणं यामुळे सून शालू वैतागली होती, त्यामुळेच तिने हत्येचा कट रचला.
काय होता प्लान ए ?
डीसीपीने दिलेल्या माहितीनुसार, आधी विनीत मिनोजा यांना रस्त्यावर धडक देऊन ठार करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र आरोपी विशाल राजी झाला नाही. त्याने सांगितलं की धडक देताना त्याचेही प्राण जाऊ शकतात. आणि घटनास्थळी पकडले गेले तर लोक त्याला मारू शकतात. त्यामुळेच या प्लानप्रमाणे हत्या करण्यास त्याने नकार दिला. त्यानंतर प्लॅन बी नुसार घरात येऊन उशीचा वापर करून तोंड दाबून विनीत यांना ठार करायचं होतं. ते मरण पावल्यावर हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्य झाल्याचं कारण सून सांगेल आणि कोणालाच काही कळणार नाही, असा प्लान होता.
का फेल झाला प्लान बी ?
सुपारी किलर विशालने सांगितलं करी प्लॅन बी फेल झाला तर प्लॅन सी वर काम करायचे होते. म्हणूनच ते लोक सुरी घेऊन गेले होते. त्याच्या म्हणण्यानुसार 9:36 वाजता शालू आपल्या नवरा सुब्रत आणि मुलगा श्रीजय सोबत बाहेर निघाली होती. त्यानंतर आठ मिनिटांनी, 9:44 वाजता दोन्ही आरोपी हे डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडून फ्लॅटमध्ये आले. प्लॅननुसार ते थेट सून शालूच्या खोलीत गेले आणि व्यापारी विनीत यांच्या येण्याची वाट पाहू लागले. या दरम्यान त्यांनी दरवाजा थोडा उघडून बाहेर पाहिलं आणि खोलीचा लाइट बंद केला होता. ते दरवाज्याचा हँडल धरून उभे राहिले होते कारण विनीत हे बाहेरून दरवाजा बंद करू शकतात आणि ते आतच अडकतील अशी त्यांना भीती होती, असंही त्यांनी सांगितलं.
लाइट लावला म्हणून चाकूने केला हल्ला
सुमारे 74 मिनिटांनंतर विनीत मिनोचा हे फ्लॅटचा दरवाजा उघडून आत गेले. त्यांनी कपडे बदलले आणि जेवण केलं. त्यानंतर फ्रिजमधून मिठाई खाल्ली आणि पाणी प्यायल. सूनबाई शालूच्या खोलीचा दरवाजा किंचितसा उघडा असल्यामुळे त्यांना संशय झाला. ते तिच्या खोलीत गेले आणि दिवा लावला. तिथे दोन्ही आरोपींना पाहून ते अवाक् झाले. तुम्ही इथे काय करत आहात, असं त्यांनी आरोपींना विचारलं. मात्र त्याच वेळी विशालने विनीतवर चाकूने एकामागोमाग अनेक वार केले. ते खाली पडल्यावर त्यांनी त्यांच्या हृदयाचे ठोके तपासले. त्यानंतर दोघे बाहेर पडले आणि विरुद्ध दिशेने वेगळे गेले आणि पार्कच्या रस्त्याने भिंत ओलांडून बाहेर निघाले.
पकडले जाण्याची नव्हती भीती कारण..
फ्लॅटमध्ये प्रवेश करताच ते कॅमेर्यांच्या नजरेत आले, त्यामुळे हत्येसारखा गंभीर गुन्हा केल्यावरही वाचू शकतील असं का वाटलं, असं पोलीसांनी दोघांनाही विचारलं . यावर विशाल म्हणाला, जो प्लॅन त्यांनी आखला होता त्यात पकडले जाण्याची शक्यता नव्हती. आम्हाला विनीत झोपेपर्यंत वाट पाहावी लागणार होती. त्यानंतर उशीने तोंड दाबून त्यांची हत्या करायची होती. मात्र त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असं सून शालू भासवणार होती. त्यामुळे संशय येण्याचा आणि कॅमेरा तपासण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून पकडले जाण्याची भीती नव्हती. या घटनेत पोलिसांची एंट्री होईल, याचा आम्हाला अंदाजच नव्हता असं आरोपींनी सांगितलं.