AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Albania Protest : पोलीसच सैरावैरा पळत सुटले, फ्रान्सनंतर आणखी एका देशात आंदोलनाचा भडका, आंदोलकांनी रस्त्यावर उतरून…पंतप्रधनांची खुर्ची धोक्यात!

अल्बानियातील लोकांमध्ये सध्या प्रचंड असंतोष निर्माण झालाय. भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी याच्याविरोधात तेथे विद्यार्थ्यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरू आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीनंतर या आंदोलनाला धार चढली.

Albania Protest : पोलीसच सैरावैरा पळत सुटले, फ्रान्सनंतर आणखी एका देशात आंदोलनाचा भडका, आंदोलकांनी रस्त्यावर उतरून...पंतप्रधनांची खुर्ची धोक्यात!
albania tirana protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2026 | 4:21 PM
Share

Albania Protest : सध्या भारतासह जगातील इतरही काही देशांत मोठी आंदोलनं केली जात आहेत. काही देशातील आंदोलनांमुळे तर आणीबाणीची स्थिती निर्माण झालीय. फ्रान्स देशात अशीच काही स्थिती असताना आता अल्बानिया या देशातही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. अल्बानियाची राजधानी तिराना या शहरात हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनातील आंदोलकांनी थेट पोलिसांवर हल्ला केलाय. या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून या देशात सत्ताबदल होतो की काय? तेथील पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो की काय? असे गंभीर प्रश्न विचारले जातायत.

अल्बानिया देशात नेमकं काय घडतंय?

अल्बानिया देशाची तिराना ही राजधानी सध्या धगधगत आहे. येथे आंदोलक रस्त्यावर उतरले असून या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. या आंदोलनाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच कृषी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारालाच आग लावून दिली. चिघळलेल्या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच रबरी गोळ्यांचा वापर करून गोळीबार केला. आंदोलकांवर पाण्याचाही मारा करण्यात आला.

आमच्यावर हल्ला होत असल्याचे लक्षात येताच आंदोलकही चांगलेच आक्रमक झाले. आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने फटाके भिरकावले. तसेच पोलिसांच्या अंगावर रॉकेट भिरकावले. याच कारणामुळे आंदोलनाला हिंसक विळण मिळाले आहे. दरम्यान, हे आंदोलन हाताळण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे.

आंदोलन नेमके का पेटले? कारण काय?

अल्बानियातील लोकांमध्ये सध्या प्रचंड असंतोष निर्माण झालाय. भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी याच्याविरोधात तेथे विद्यार्थ्यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरू आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीनंतर या आंदोलनाला धार चढली. तिराना तसेच अल्बानिया देशाच्या अन्य शहरात आंदोलनाचे हे लोण पसरले. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार आंदोलकांनी अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांचा राजीनामा मागितला आहे. आंदोलकांनी शासकीय इमारती आणि बँकांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे आता या देशात नेमके काय होणार? हे पाहणे मत्त्वाचे ठऱणार आहे.

Follow Us
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र