AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone alert : 140 किमी प्रति तास वेगाने धडकणार चक्रीवादळ, आयएमडीचा हायअलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात…

मोठी बातमी समोर येत आहे, आयएमडीकडून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस सात राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Cyclone alert : 140 किमी प्रति तास वेगाने धडकणार चक्रीवादळ, आयएमडीचा हायअलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात...
आयएमडीकडून चक्रीवादळाचा इशारा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 25, 2026 | 4:04 PM
Share

बंगालच्या उपसागरामध्ये वातावरणात मोठा बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून (IMD) आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या समुद्र किनारी भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 28 ऑक्टोबर रोजी हे चक्रीवादळ आध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. या काळात हवेचा वेग ताशी 115 ते 125 किमी एवढा प्रचंड राहण्याची शक्यता आहे, त्यानंतर हा हवेचा वेग ताशी 140 किमी पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे, त्यामुळे पुढील तीन दिवस समुद्र किनारी भागात राहणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचे असणार आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली ही वातावरणीय प्रणाली पूर्णपणे एकदाच सक्रिय होणार नाही, तर हळुहळु तिचं चक्रि‍वादळात रूपांतर होणार आहे. या काळात प्रति तास 140 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 28 ऑक्टोबर रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रिवादळ बापटला ते विशाखापट्टनम दरम्यानच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून सध्या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं जात आहे.

या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार 25 ते 26 ऑक्टोबरदरम्यान तामिळनाडू, पॉंडिचेरी, केरळ आणि लक्षद्विप या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य भारतात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 30 ते 31 ऑक्टोबरदरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून एकूण सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. 28 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी