AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात राहण्याची लाज वाटते… बड्या नेत्याचं धक्कादायक विधान; भाजपने थेट…

Politics : देशातील एका बड्या नेत्याने भारतात राहण्याची लाज वाटते असं विधान केलं आहे. त्यानंतर आता भाजपने यावर उत्तर देत सडकून टीका केली आहे.

भारतात राहण्याची लाज वाटते... बड्या नेत्याचं धक्कादायक विधान; भाजपने थेट...
kapil sibbal controvercial statementImage Credit source: Google
| Updated on: Jun 01, 2026 | 7:39 PM
Share

राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी धक्कादायक विधान केले आहे. बंगालमधील खासदारावर झालेल्या हल्ल्यावर बोलताना त्यांनी, भारतात राहण्याची लाज वाटते असं त्यांनी म्हटलं आहे. सिब्बल यांच्या या विधानानंतर भाजपने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. भाजपने म्हटले की, सिब्बल हे याच देशाच्या सर्वोच्च न्यायालयातून कोट्यवधी रुपये कमावतात आणि त्याच देशाबद्दल लाज वाटत असल्याचे म्हणत आहेत. 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला आणि शेकडो लोक मारले गेले, तेव्हा सिब्बल गप्प का होते, असा सवालही भाजपने उपस्थित केला.

पश्चिम बंगालमधील टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर कपिल सिब्बल यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली होती. सिब्बल यांनी म्हटले होते की, ‘ज्या देशात सत्ताधारी पक्ष लोकशाहीच्या मुळांवर घाव घालण्यासाठी कोणतीही पद्धत वापरतो, त्या देशात राहून मला लाज वाटते.’ सिब्बल यांच्या विधानाचा रोख थेट भाजपकडे असल्याचे मानले गेले. त्यानंतर आता भाजपने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपने काय म्हटले?

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी सिब्बल यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. पहिला प्रश्न त्यांनी सिब्बल यांच्या कमाईबाबत उपस्थित केला. पुनावाला यांनी म्हटले की, ‘सिब्बल हे याच देशाच्या सर्वोच्च न्यायालयात वकिली करून कोट्यवधी रुपये कमावतात, तरीही त्यांना या देशात राहणे लाजिरवाणे वाटते.’ पुढे बोलताना पुनानाला म्हणाले की, 2021 मध्ये पश्चिम बंगाल हिंसाचारावर होता. त्यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या 300 हून अधिक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा कपिल सिब्बल हे एक शब्दही बोलले नाहीत. तसेच इतर प्रकरणांवरही ते शांत होते.

शहजाद पुनावाला यांनी पुढे बोलताना विरोधकांच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपचा विरोध करणे वेगळे आहे, पण देशाचा विरोध करणे हे वेगळे आहे. राजकीय मतभेद असू शकतात, पण देशाविषयी द्वेष का? असा सवाल त्यांनी केला. पुढे पूनावाला यांनी राहुल गांधी यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय सैन्याच्या शौर्यावरही प्रश्न उपस्थित केले होते.

अभिषेक बॅनर्जी प्रकरणावर भाजपने काय म्हटले?

अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पूनावाला म्हणाले की, ‘या घटनेचे समर्थन कोणीही करत नाही. मात्र या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही लोकांचे संबंध तृणमूल काँग्रेसशीच आहेत. बहुतांश विरोधी नेत्यांनी या हल्ल्याचा उघडपणे निषेध केलेला नाही. हा तृणमूल काँग्रेसचा अंतर्गत वाद आहे.’

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच